कामबंद आंदोलन करून सर्वसामान्यांना वेठीस धरणाऱ्या तलाठ्यांना निलंबित करा - अमोल ठुबे
तलाठ्यांनी कार्यालये न उघडल्यास बुधवारी कान्हूर मध्ये आंदोलन
पारनेर प्रतिनिधी
वरिष्ठ व कनिष्ठांच्या वादात सर्वसामान्य जनतेचे प्रश्न प्रलंबित ठेवून कामबंद आंदोलन करून नागरिकांना वेठीस धरणाऱ्या महसूल विभागाच्या तलाठ्यांना निलंबित करण्यात यावे. गुरुवार पर्यंत तलाठ्यांनी आपली कार्यालये पूर्ववत सुरू करून नागरिकांची कामे मार्गी न लावल्यास गुरुवारी कान्हूर पठारमध्ये आंदोलन करण्यात येईल असा इशारा पठार भागातील सामाजिक कार्यकर्ते युवानेते अमोल एकनाथ ठुबे यांनी दिला आहे.
तहसीलदारांच्या व महसूल कर्मचाऱ्यांच्या अंतर्गत वादात महसूल कर्मचाऱ्यांनी कामबंद आंदोलन करून नागरिकांना वेठीस धरणे चुकीचे आहे. आधीच तलाठी कर्मचारी दिलेल्या वेळेत कार्यालयात हजर राहत नाहीत. सजेच्या ठिकाणी तलाठ्यांना मुक्कामी राहणे बंधनकारक असताना देखील तलाठी सजेच्या ठिकाणी थांबत नाहीत. बरेच दिवस तर तलाठी गावात देखील येत नाहीत. कोरोनाच्या काळात तलाठ्यांना सजेच्या गावात थांबणे बांधकारक असताना अनेक वेळा तलाठी गैरहजर होते. आशा कामचुकार तलाठ्यांना जिल्हाधिकाऱ्यांनी निलंबित करावे. त्यांच्या संपत्तीची चौकशी करावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते अमोल ठुबे यांनी केली आहे. तसेच तलाठ्यांनी गुरुवारपर्यंत कार्यालये उघडून नागरिकांची प्रलंबित कामे मार्गी लावली नाही तर गुरुवारी कान्हूर पठार मध्ये आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशारा अमोल ठुबे यांनी दिला आहे.याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देनार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

0 Comments