आंदोलनामध्ये ३२ कर्मचारी हजर २७ कर्मचाऱ्यांची कार्यालयात व आंदोलनालाही दांडी
तहसीलदारांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केला अहवाल सादर
संबंधितांवर कारवाई करावी - तहसीलदारांचा अहवाल
पारनेर प्रतिनिधी
तहसीलदारांच्या विरोधात पारनेरच्या महसूल कर्मचाऱ्यांचे ७ दिवसांपासून कामबंद आंदोलन सुरू आहे. या आंदोलनात ७ व्या दिवशी फक्त ३२ कर्मचारी उपस्थित होते. तर उर्वरित २७ कर्मचारी ना आंदोलनस्थळी उपस्थित होते ना कामाच्या ठिकाणी. त्यांच्या अनुपस्थितीबाबत काम करत असलेल्या कार्यालयाला देखील कुठलीही माहिती दिली नसल्याने आपत्ती व्यवस्थापन (कोव्हीड १९) व पुरवठा विभागाचे कामकाज ठप्प असल्याने त्यांच्यावर प्रशासकीय कारवाई करण्यात यावी असा अहवाल तहसीलदार ज्योती देवरे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना पाठविला आहे.
तहसीलदारांनी जिल्हाधिकाऱ्यांना पाठविलेल्या अहवालात म्हटले आहे की, महसूल कर्मचाऱ्यांचे २५ ऑगस्ट पासून कामबंद आंदोलन सुरू आहे.याबाबत रोज इमेल द्वारे आपणास अहवाल सादर केला जात आहे. परंतु या आंदोलनामध्ये महसूल विभागाचे नेमके किती कर्मचारी सहभागी आहेत हे अद्याप महसूल कर्मचारी संघटनेने तहसील कार्यालयाला कळविले नाही. मंगळवारी (३१ ऑगस्ट) दुपारी ११:५० वा किती कर्मचारी आंदोलनस्थळी आहे याची खात्री केली असता फक्त ३२ कर्मचारी आंदोलन स्थळी असल्याचे निदर्शनास आले. तहसील कार्यालयातील ४ नायब तहसीलदारांच्या समोर खातरजमा करून उपस्थित ३२ कर्मचाऱ्यांच्या स्वाक्षरी घेण्यात आल्या. उर्वरित २७ कर्मचारी हे आंदोलन स्थळी उपस्थित नव्हते व ते कार्यालयात देखील हजर नव्हते. त्यांच्या कार्यालयातील अनुपस्थिबद्दल कार्यालयाकडे कुठलीच परवानगी अथवा माहिती नव्हती. या कर्मचाऱ्यांच्या अनुपस्थितमुळे आपत्ती व्यवस्थापन (कोव्हीड १९, नसर्गिक आपत्ती) व पुरवठा विभागाचे अत्यावश्यक सेवेचे कामकाज ठप्प झाले असलेने त्या कर्मचाऱ्यांवर प्रशासकीय कारवाई करण्यात यावी असा अहवाल तहसीलदार ज्योती देवरे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना पाठविला आहे.
आंदोलनस्थळी व कार्यालयामध्ये अनुपस्थित असणाऱ्या कर्मचाऱ्यांमध्ये साठे डी बी(तलाठी जवळा), पवार एस ई(तलाठी रांजणगाव मशीद), मंडलिक एस बी(मंडलाधिकारी सुपा), मोरे एस एल(तलाठी सुपा), सोनवणे पी एस(तलाठी चिंचोली), गोल्हार आर डी(तलाठी पाडळी कान्हूर), मुदिगोंडा एस(रोहयो अका), कदम एस डी(पुहिअका), औटी एस बी(पुअका), गावडे ए आर(तलाठी पळवे), पवार डी डी(महसूल सहाययक), चव्हाण डी यु(महसूल सहाय्यक), राजुरे पी(महसूल सहाययक), बल्लाळ डी के(तलाठी पारनेर), गोरे ए एस(तलाठी टाकळी ढोकेश्वर), कोते एस सी(तलाठी वाळवणे), येवले बी एस(तलाठी गोरेगाव), तनपुरे एस एम(तलाठी चोंभूत), शिरसाठ पी व्ही(तलाठी नारायनगव्हान), तराळ एम बी(तलाठी वासुंदे), कदम दीपक(मंडलाधिकारी भाळवणी), पवार के टी(मंडलाधिकारी पळशी), मेहेत्रे डी आर(तलाठी लोणी मावळा), नांगरे एस जी(तलाठी वडगाव सावताळ), सारकाळे एस बी(तलाठी राळेगण थेरपाळ), शिंदे एस आर(महसूल सहाययक), वैराळकर (पुरवठा निरीक्षक) आदी २७ कर्मचारी अनुपस्थित होते.

0 Comments