कर्मचारी संपावर तहसीलदार कामावर
महसुलचे कर्मचारी काम बंद आंदोलनात तर तहसीलदार करतात नागरिकांची कामे
नागरिकांची कामे अडून देणार नाही - तहसीलदार ज्योती देवरे
![]() |
| महसूल कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन असताना देखील नागरिकांचे कामे प्रलंबित राहू न देता नागरिकांचे कामे करताना तहसीलदार ज्योती देवरे व इतर अधिकारी व कर्मचारी. छाया - चंद्रकांत कदम |
पारनेर (चंद्रकांत कदम)
पारनेरच्या तहसीलदार ज्योती देवरे यांच्या मनमानी व दडपशाही धोरणाच्या विरोधात महसूल कर्मचाऱ्यांनी २५ ऑगस्ट पासून काम बंद आंदोलन करत संप केला आहे. तर दुसरीकडे नागरिकांची कुठलीही कामे अडू नये म्हणून स्वतः तहसीलदार ज्योती देवरे यांच्यासह नायब तहसीलदार व इतर अधिकारी नागरिकांची कामे मार्गी लावत आहेत. एकीकडे कर्मचारी संपावर असताना देखील नागरिकांची कामे प्रलंबित राहू नये म्हणून स्वतः तहसीलदार कर्मचाऱ्यांच्या भूमिकेतून नागरिकांची कामे मार्गी लावत आहेत.
तहसीलदार ज्योती देवरे मनमानी व दडपशाही करत असून मनमानी करत असल्याचा आरोप करत महसूल विभागाचे तलाठी, मंडल अधिकारी, कारकून व इतर असे ४१ कर्मचारी काम बंद आंदोलनात २५ ऑगस्ट पासून सहभागी झालेले आहेत. कर्मचाऱ्यांच्या आंदोपणाबाबत तहसीलदार ज्योती देवरे यांना कुठलीच लेखी कल्पना अथवा तक्रार मिळाली नसल्याचे तहसीलदार ज्योती देवरे यांनी सांगितले. कर्मचारी जरी संपावर असले तरी नागरिकांची कुठलीच कामे प्रलंबित राहणार नसून आम्ही मी स्वतः तहसीलदार, नायब तहसीलदार अविनाश रणदिवे, नायब तहसीलदार माळवे आदींसह इतर अधिकाऱ्यांच्या मदतीने नागरिकांचे कामे मार्गी लावत आहोत. महसुलचे कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन सुरू असून नागरिकांचे कामे अडून राहतील असा गैरसमज नागरिकांच्यात असून तसे काही न होता आम्ही स्वतः तहसीलदार, णक्यब तहसीलदार नागरिकांचे कामे मार्गी लावत आहोत. नागरिकांची कुठलीच कामे प्रलंबित राहणार नाही. नागरिकांनी गैरसमज करू नये. कोणाची काही कामे असल्यास माझ्याशी संपर्क साधण्याचे आवाहन तहसीलदार ज्योती देवरे यांनी केले आहे.
ग्रामीण रुग्णालयाचे देखील कामकाज तहसीलदारांच्या मार्गदर्शनाखाली सुरळीत
पारनेर ग्रामीण रुग्णालयाच्या अधीक्षक डॉ उंद्रे या ६ ऑगस्ट पासून ग्रामीण रुग्णालयात हजर नाहीत तसेच दुसऱ्या मेडिकल ऑफिसर सुद्धा काम सोडून गेल्या आहेत. ग्रामीण रुग्णालयात अनेक कोव्हीड रुग्ण उपचार घेत आहेत. रुग्णांना उपचारासाठी हाल होऊ नये म्हणून त तहसीलदार ज्योती देवरे यांनी इतर डॉक्टरांच्या मदतीने ग्रामीण रुग्णालयातील कामकाज सुरळीत ठेवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरु ठेवले आहेत.
प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांच्या वादात इतर कर्मचार्यांना संप करायला लावणे अतिशय चुकीचे आहे. दडपशाही होत असेल तर प्रशासनात वरिष्ठांकडे तक्रार दाखल करण्याची व्यवस्था आहे. परंतु तसे न करता रस्त्यावर उतरने हे सेवा नियमांचे उल्लंघन आहे. समान्य नागरिकांना वेठीस धरणे चुकीचे आहे. अश्या तलाठ्यांना तात्काळ निलंबित केले जावे.
सचिन भालेकर (अध्यक्ष - पारनेर परिवर्तन)


0 Comments