पारनेर प्रतिनिधी
कुरुंद ता- पारनेर येथील हमालवाडी येथील शेतकरी शरद महाराज रुपनर यांनी आपल्या गज्या या बैलाचा पहिला वाढदिवस केक कापून व कोरोना चे नियम पाळून गर्दी न करता साजरा केला. या प्राणीमित्र शेतकऱ्याच्या अनोख्या उपक्रमाचे सर्वत्र स्वागत होत आहे.
शेतकरी हा आपल्या बैलाला पोटच्या पोरासारखा जपत असतो म्हणून त्याचाही वाढदिवस रुपनर परिवाराने मोठ्या उत्साहात साजरा केला. रक्ताच्या नात्यातील माणसांवर आपण जेवढे प्रेम करतो तेवढेच प्रेम मुक्या प्राण्यांवर केले पाहिजे हे रुपनर परिवाराने दाखवून दिले आहे. रुपनर परिवारातील महिलांनी बैलाचे औक्षण करून वाढदिवस साजरा केला. यावेळी प्रसिद्ध गाडामालक निलेश काळे, ग्रा.प सदस्य कैलास कोठावळे, सदस्य बापू खेमनर, सदस्य चेतन उबाळे, माऊली शिंदे, राहुल शेंडगे, वाल्मिक थोरात,राजू घावटे, भाऊ चौधरी उपस्थित होते. यावेळी कुरुंद ग्रा. प सदस्य निलेश शेंडगे यांनी रुपनर परिवाराच्या या उपक्रमाचे कौतुक करत शासनाने बैलगाडा शर्यती वरील बंदी उठवावी अशी मागणी देखील केली.


0 Comments