अकोले प्रतिनिधी
दिनांक 16 ऑगस्ट 2019 रोजी अकोले तालुक्यातील विद्यार्थी प्रतिनिधी कुमारी शर्मिला सुभाष येवले. हिने महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेतली. या भेटीत तिने राज्यातील विविध क्षेत्रातील विद्यार्थ्यांचे प्रश्न यावर चर्चा केली त्यात प्रामुख्याने पोलीस भरती, बेरोजगारी,स्पर्धा परीक्षा करणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रश्न प्रलंबित नोकर भरती यांसारख्या विषयांवर चर्चा केली.
चर्चा करत असताना राज्यपाल शर्मिलाला म्हणतात.. "आप तो नेता जज रही हो आप नेता ही बनो " त्यावर स्मितहास्य देत तिने प्रतिक्रिया दिल्या. "आपका आशीर्वाद होगा तो जरूर बनेयेंगे नेता भीं " असं ती म्हणाली त्यावर त्यांनी "आप जैसे लडकियों की इस राजनैतिक क्षेत्र जरूरत है!" अश्या स्वरूपाच्या प्रतिक्रिया राज्यपाल महोदयांनी दिल्या.

0 Comments