शिवसेनेच्या वतीने पिंपरी जलसेनमध्ये डोळ्यांचे शिबीर संपन्न
नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
पारनेर प्रतिनिधी
हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने व शिवसेना पक्षप्रमुख मा. मुख्यमंत्री उद्धवसाहेब ठाकरे यांच्या प्रेरणेने व शिवसेना व लोककल्याण आरोग्य केंद्र मुंबई-ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने पारनेर तालुक्यातील पिंपरी जलसेन येथे आरोग्य चिकित्सा व नेत्र परीक्षण चष्मा व औषध वाटप शिबिर घेण्यात आले. या शिबिराला नागरिकांनी देखील उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
या शिबिराचे उद्घाटन पारनेर पंचायत समिती सदस्य डॉ. श्रीकांत पठारे व पिंपरी जलसेनचे सरपंच सुरेश काळे यांच्या हस्ते पार पडले. या शिबिरामध्ये नागरिकांना डोळे तपासणी करून अल्प दरात चष्मे वाटप करन्यात आले. तसेच सांधीदुखी असणाऱ्या नागरिकांना मोफत औषध वाटप करण्यात आले. यावेळी रेवजी कदम, भानुदास साळवे, बाबाजी वाढवणे, बाळसाहेब वाढवणे, संदीप वाढवणे, अरुण कदम, अक्षय कदम, सुभाष थोरात, दगडू बोरुडे, पोपट थोरात, ज्ञानदेव वाढवणे, पोपट वाढवणे, अक्षय कदम, आदिनाथ कदम, गणपत कदम, नानभाऊ कदम आदी नागरिक उपस्थित होते.

0 Comments