राजेश्वरी कोठावळे यांचे पूरग्रस्तांसाठी अहमदनगर राष्ट्रवादी युवतीच्या वतीने मदतीचे आवाहन

 


राजेश्वरी कोठावळे यांचे पूरग्रस्तांसाठी अहमदनगर राष्ट्रवादी युवतीच्या वतीने मदतीचे आवाहन


 अहमदनगर राष्ट्रवादी युवती काँग्रेस पार्टीच्या वतीने राबविणार  सामाजिक उपक्रम


 पूरग्रस्तांसाठी वस्तू स्वरुपात करणार मदत; मदतीचे केले ग्रामस्थांना अहवान


 राजेश्वरी कोठावळे यांना आमदार निलेश लंके यांच्या सामाजिक कामाची प्रेरणा


 पारनेर/प्रतिनिधी :

राज्यातील सांगली, कोल्हापूर, कराड, महाड, चिपळूण, या पश्चिम महाराष्ट्रातील व कोकणातील भागामध्ये जोरदार पावसामुळे आलेल्या महापुराने संपूर्ण जनजीवन विस्कळीत झाले आहे.  या भागातील सर्वसामान्य जनतेला अहमदनगर राष्ट्रवादी युवती काँग्रेस पार्टीच्या वतीने जिल्हाध्यक्षा  राजेश्वरीताई कोठावळे यांनी मदतीचे आवाहन केले आहे.  या भागात दरडी कोसळून अनेक दुर्दैवी माणसे मृत्युमुखी पडली तसेच जनावरे वाहून गेली व कोरोना उपचार केंद्रात पाणी घुसल्याने वीजपुरवठा खंडित होऊन वेंटिलेटर  बंद पडून रुग्णही मृत्युमुखी पडले. समाजाचे आपण काहीतरी देणे लागतो हीच सामाजिक भावना मनात ठेवून अहमदनगर राष्ट्रवादी युवती काँग्रेस पार्टीच्या जिल्हाध्यक्ष राजेश्वरी ताई कोठावळे यांनी या पूरग्रस्त भागातील जनतेला मदत करण्याचे आवाहन केले आहे.   कोठावळे यांनी प्रसिद्धीस  दिलेल्या निवेदनात  त्याने असे आव्हान केले आहे की अहमदनगर जिल्ह्यातील नागरिकांनो चला माणुसकीचे दर्शन घडवूया आणि राष्ट्रवादी युवती काँग्रेस पार्टी अहमदनगर यांच्यातर्फे पूरग्रस्तांसाठी एक हात मदतीचा  देऊया.  त्यांनी नागरिकांना आर्थिक स्वरूपात मदत न करण्याचे आव्हान केले आहे तर मदत पुढील प्रमाणे करण्याचे ते आव्हान करतात दैनंदिन उपयोग वस्तू, मीठ, हळद, गहू, ज्वारी, तांदूळ, रवा, पोहे, साखर, डाळ( किराणा वस्तू कोणत्याही देऊ शकतो), अंगाचा व कपड्याचा साबण, मिरची पावडर, चहापत्ती, टूथ पेस्ट, सॅनिटरी नॅपकिन्स, तेल, टॉवेल, मास्क, सॅनिटायझर, बिस्कीट ,फरसाण, चिवडा, पाणी बॉटल, सुके पदार्थ (जास्त दिवस टिकणारे खाद्य पदार्थ) उबदार कपडे,चादरी, चटई. आदी. 


 दरम्यान अहमदनगर राष्ट्रवादी युवती काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्षा राजेश्वरीताई कोठावळे यांनी आपणास जर मदत करावयाची असेल तर ९११२०४४७७७, ७७९६७४७२२७, ९३७०३१९९३१,  नंबर वर संपर्क करण्याचे आवाहन केले आहे. 

 दरम्यान  अहमदनगर राष्ट्रवादी युवती काँग्रेस पार्टीच्या जिल्हाध्यक्षा राजेश्वरीताई कोठावळे या संपूर्ण अहमदनगर जिल्ह्यात पारनेर नगर विधानसभा मतदार संघाचे आमदार आरोग्यदूत निलेश लंके साहेब यांच्या माध्यमातून काम करत आहेत त्यांच्या  सामाजिक कामांमध्ये त्यांचा नेहमीच सहभाग असतो पूरग्रस्तांसाठी त्यांनी केलेले मदतीच्या अहवान  संकटात सापडलेल्या समाजाला मदत करण्याची सामाजिक जाणीव त्यामधून दिसते.  त्यांच्या या अहवानाला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व नागरिकांमधून मोठा प्रतिसाद  मिळेल. त्यांचे हे पूरग्रस्तांसाठी असलेले सामाजिक कार्य नक्कीच चांगले आहे.


 

 

 

राजेश्वरी कोठावळे यांना आमदार निलेश लंके यांच्या सामाजिक कार्याची प्रेरणार

पारनेर नगर विधानसभा मतदार संघाचे आमदार निलेश लंके हे  नियमित समाजातील विविध घटकांना सामाजिक मदत करत असतात. संकटात सापडलेल्या गरीब दलित जनतेला ते नेहमी पुढे येऊन मदत करतात. कोरोनाच्या काळात त्यांनी केलेले कार्य नक्कीच कौतुकास्पद आहे. त्यांच्या कार्यापासून सामाजिक प्रेरणा घेत सध्या संपूर्ण अहमदनगर जिल्ह्यात राष्ट्रवादी युवती काँग्रेस पार्टीच्या जिल्हाध्यक्षा  राजेश्वरीताई कोठावळे या काम करत आहेत.

Post a Comment

0 Comments