राजेश्वरी कोठावळे बनल्या अनाथ मुली साठी आधार !
सुप्रियाताई सुळे यांच्या 'राष्ट्रवादी जिवलग' संकल्पनेतून कोविड अनाथांशी आपुलकीचं नातं जपण्याचा राजेश्वरी कोठावळे यांचा प्रयत्न
पारनेर प्रतिनिधी
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने 'राष्ट्रवादी जिवलग' हा सुप्रियाताई सुळे यांच्या संकल्पनेतून उपक्रम राज्यभरात राबविण्यात आला. या उपक्रमाच्या माध्यमातून अहमदनगर जिल्ह्यातील नगर शहरातील स्तुती या अनाथ मुलीस कौटुंबिक प्रेमाचे, विश्वासाचे व हक्काचे नाते मिळावे या हेतूने 'राष्ट्रवादी जिवलग' च्या माध्यमातून मायेचे छत्र देण्यात आले आहे. दि. 23 जुलै रोजी स्तुती या अनाथ मुलीचा वाढदिवस होता.
यावेळी अहमदनगर राष्ट्रवादी युवती काँग्रेस पार्टीच्या जिल्हाध्यक्षा राजेश्वरी'ताई कोठावळे यांनी या आपल्या अनाथ बहिणीला वाढदिवसानिमित्त भेटून शुभेच्छा दिल्या व तिची ओवाळणी करत तिला भेटवस्तू स्वरूपात एक घड्याळ भेट दिले. त्यासोबत एक झाड भेट दिले व झाड भेट देऊन असा संदेश देण्यात आला की जसे झाड मोठे होईल तसे स्तुतीने यशस्वी व्हावे. यावेळी तिच्या आजी- आजोबांना व तिला खूप आनंद झाला. यावेळी बोलताना तिचे आजी-आजोबा म्हणाले की आमच्या स्तुतीला खऱ्या अर्थाने राजेश्वरी'ताई सारखी एक मोठी बहीण मिळाली आहे. राजेश्वरी ताई व तिच्या युवती सहकाऱ्यांनी आम्हाला दिलेले प्रेम हे नक्कीच आमच्यामध्ये व स्तुती मध्ये आत्मविश्वास निर्माण करणारे आहे. तसेच दरम्यान यावेळी बोलताना स्तुतीच्या आजी व आजोबांनी राष्ट्रवादीच्या नेत्या खासदार सुप्रिया'ताई सुळे व राष्ट्रवादी युवती प्रदेशाध्यक्षा सक्षणा'ताई सलगर यांचे आभार मानले. व कार्याचे कौतुक केले. यावेळी बोलताना राष्ट्रवादी युवती काँग्रेस पार्टीच्या जिल्हाध्यक्षा राजेश्वरी ताई कोठावळे म्हणाल्या की यापुढील काळात स्तुतीला कोणत्याही प्रकारे एकटेपणाची भावना मनात निर्माण होणार नाही कारण मी तिची मोठी बहीण म्हणूनच तिच्यासोबत यापुढील काळात असणार आहे. तिला आपल्या जीवनामध्ये यशस्वी होण्यासाठी नेहमी मार्गदर्शन करून प्रेरणा व स्फूर्ती देण्याचा प्रयत्न करणार आहे. राजेश्वरीताई कोठावळे यांच्यासोबत यावेळी पारनेर राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या माया रोकडे अहमदनगर महानगरपालिकेच्या काळे मॅडम व इतर सहकारी उपस्थित होत्या.

0 Comments