पदाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना न्याय देणार - सीताराम देठे
आत्मा कमिटीमध्ये सदस्यपदीनिवड झाल्याबद्दल देठे यांचा डॉ श्रीकांत पठारे यांनी केला सन्मान
पारनेर प्रतिनिधी
आत्मा कमिटीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना न्याय मिळवून देणार असल्याचे प्रतिपादन आत्मा कमिटीचे सदस्य व कीन्ही गावचे माजी उपसरपंच, सेवा संस्थेचे संचालक सीताराम देठे यांनी केले आहे.
पारनेर तालुक्यातील आत्मा कमिटीच्या सदस्यपदी कीन्ही येथील सीताराम देठे यांची निवड झाल्याबद्दल देठे यांचा पारनेर पंचायत समिती सदस्य डॉ श्रीकांत पठारे यांनी सत्कार केला.यावेळी ते बोलत होते. शेतकऱ्यांच्या दृष्टीने महत्वाच्या असणाऱ्या या कमिटीमध्ये काँग्रेस च्या माध्यमातून माझी सदस्यपदी निवड झाली असून शेतकऱ्यांना शासनाच्या योजना पोहोचविणार आहे. देठे यांच्या निवडीबद्दल डॉ श्रीकांत पठारे यांनी त्यांचा सन्मान करून पुढील कामासाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी संतोष सालके, अमोल ठुबे, रवींद्र ठुबे, प्रकाश उघडे, पत्रकार चंद्रकांत कदम,अमोल गजरे आदी उपस्थित होते.

0 Comments