शिवसेना तालुकप्रमुख बंडूशेठ रोहोकले यांच्याकडून कोव्हीड सेंटरला दीड लाखांचे बेड

पारनेर येथील पूर्णवाद भवन येथिल कोव्हीड सेंटरला बेड भेट, रुग्णांना फळे वाटप ; सर्व स्तरातून आभार



पारनेर प्रतिनिधी


पारनेर येथील पुर्णवाद भवन येथील कोव्हीड सेंटरला तालुक्यासह सर्वच स्तरातून मदतीचा ओघ सुरू आहे.  शिवसेना पारनेर तालुकप्रमुख विकास (बंडूशेठ) रोहोकले यांच्याकडून डॉ श्रीकांत पठारे संचलित ग्रामीण रुग्णालय डेडिकेटेड कोव्हीड हेल्थ केअर सेंटरला दीड लाख रुपये किमतीचे रुग्णांसाठी बेड भेट दिले आहेत. 

        शिवसेना तालुकप्रमुख विकास रोहोकले यांचे दातृव सर्व तालुक्याला ज्ञात आहे. रोहोकले यांनी आतापर्यंत अनेक सामाजिक व गरजू लोकांना आर्थिक व इतर मदत केली आहे. आता पारनेर येथील पूर्णवाद भवन येथील कोव्हीड सेंटरला विकास रोहोकले यांच्याकडून दीड लाख रुपये किमतीचे १५ बेड भेट देण्यात आले. याशिवाय रुग्णांना फळे वाटप करण्यात आले. रोहोकले यांच्या या सामाजिक कामाबद्दल तालुक्यातील सर्व स्तरातून आभार मानण्यात येत आहे.


सामाजिक भावनेतून मदत - रोहोकले

आपण समाजाचे काही तरी देणे लागतो या उदात्त भावनेतून मी सामाजिक मदत करत असतो. कोव्हीड रुग्णांना कोव्हीड मधून बाहेर पडण्यासाठी मानसिक आधार देणे गरजेचे आहे. म्हणून या रुग्णांना भेट देऊन चौकशी केली व बेड भेट दिली असल्याची प्रतिक्रिया शिवसेना तालुका प्रमुख बंडूशेठ रोहोकले यांनी दिली.

Post a Comment

0 Comments