सरपंच श्रीकांत डेरेंच्या वाढदिवसानिमीत्त रेनवडीमधे अनोखा उपक्रम...
कोरोना काळात कामगिरी बजावणाऱ्या पत्रकारांचा सन्मान करून व वृक्षारोपण करून वाढदिवस साजरा...
पारनेर प्रतिनिधी - चंद्रकांत कदम
पारनेर तालुक्यातील रेनवडी या गांंवचे सरपंच श्रीकांत राजाराम डेरे यांच्या ४४ व्या वाढदिवसा निमीत्त रेनवडी ग्रामपंचायतने अनावश्यक खर्च टाळत गावामधे वृक्षारोपण केले व कोरोना काळामधे चांगली कामगीरी बजावणार्या पत्रकारांचा सन्मान करत एक अनोखा उपक्रम राबविला.यावेळी ग्रामस्थ व पत्रकारांनी श्रीकांत डेरे यांचा शाल,श्रीफळ देवुन सन्मान केला. यावेळी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकारसंघाचे जिल्हासचिव तथा तालुकाध्यक्ष दत्ता गाडगे,निलेश लंके प्रतिष्ठाण चे युवा तालुका अध्यक्ष विजय औटी,पाडळीचे सरपंच भाऊसाहेब डेरे,काठापूरचे सरपंच दस्तगीर मुजावर, ग्रामसेवक प्रविण खराडे,पत्रकार संजय मोरे आदींनी सरपंच डेरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. कोरोनाचे पार्श्वभूमीवर कुठलाही गाजावाजा न करता अनावश्यक खर्च टाळत मान्यवरांच्या हस्ते गावात व नदी काठावर वृक्षारोपण करण्यात आले.तसेच महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे जिल्हासचिव तथा तालुका अध्यक्ष दत्ता गाडगे यांना रेनवडी ग्रामपंचायत च्या वतीने " कोरोनायोध्दा " पुरस्कार देवुन सन्मानित करण्यात आले. यावेळी उपस्थित पत्रकारांचा सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देवुन सन्मानही करण्यात आला.यावेळी बोलताना निलेश लंके प्रतिष्ठाणचे युवा तालुका अध्यक्ष विजय औटी यांनी रेनवडी गावचे सरपंच श्रीकांत डेरे यांच्या कार्याचा आढावा घेत त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.आमदार निलेश लंके हे सरपंच डेरे यांच्या पाठीशी सदैव आहेत आणि सहकार्य करतील.राष्ट्रवादी काँग्रेसचा एक चांगला तरुण सहकारी रेनवडी गावचा सरपंच म्हणुन चांगले काम करत असल्याचा अभिमान असल्याचे सांगीतले.त्यांच्या पाठीशी राष्ट्रवादी काँग्रेसची पूर्ण ताकद उभी करु असेही विजय औटी म्हणाले.यावेळी बोलताना, महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे जिल्हासचिव तथा तालुका अध्यक्ष दत्ता गाडगे म्हणाले,पूर्वी काबाड कष्ट करणारा सर्वसामान्य कुटुंबातील एक तरुण आज रेनवडी गावचे सरपंचपद भूषवत आहे.सरपंच श्रीकांत डेरे हे माझे वर्गमित्र असुन,ते बालपणा पासुनच खुप कष्टाळु, जिद्दी आणि मेहणती आहेत.एखादी गोष्ट ठरविल्यावर ति पूर्ण केल्या शिवाय श्रीकांत डेरे थांबत नाहीत.आज मला रेनवडी ग्रामपंचायतने दिलेला कोरोना काळामधे केलेल्या चांगल्या कामाबद्दल " कोरोना योध्दा पुरस्कार " दिला हा माझ्यासाठी खुप मोठी उर्जा देवुन गेला आहे. ती आजवर माझ्याकडुन झालेल्या कामाची पावती आहे. तसेच माझ्या सर्व पत्रकार बांधवांनाही कोरोनायोध्दा सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देत सन्मान केल्याबद्दल ग्रामस्थांना धन्यवाद दिले.यावेळी सरपंच श्रीकांत डेरे आजवरच्या कार्याचा परामर्श घेत त्यांना गाडगे यांनी भरभरुन शुभेच्छा दिल्या.
.याप्रसंगी उपसरपंच कांचन बाबासाहेब येवले,ग्रामपंचायत सदस्य दत्ता येवले,सत्यभामा येवले,विजय पडवळ, किरणशेठ ढोमे, ग्रामसेवक मिना काळे, किसन जाधव,राजेंद्र डेरे. पत्रकार संघाचे कार्याध्यक्ष बाबाजी वाघमारे,उपाध्यक्ष विनोद गायकवाड,शिरीष शेलार,राम तांबे,पारनेर शहराध्यक्ष संतोष सोबले,खजिनदार संदिप गाडे,प्रसिद्धीप्रमुख श्रीनिवास शिंदे,निघोज परीसर अध्यक्ष सागर आतकर,आनंदा भूकन, विजय रासकर,संपत वैरागर, सुभाष भामरे,स्वप्निल भालेराव, चंद्रकांत कदम,प्रसिद्धीप्रमुख श्रीनिवास शिंदे आदी पत्रकार व ग्रामस्थ उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रास्ताविक दत्ता येवले यांनी तर सुत्रसंचालन राजेंद्र डेरे यांनी केले.अल्पोपहाराने कार्यक्रमाची सांगता झाली.

0 Comments