पारनेर तालुक्यातील धोत्रेच्या रस्त्यासाठी माजी आ. विजयराव औटिंकडून २ कोटी ३६ लाखांचा निधी मंजूर

 पारनेर तालुक्यातील धोत्रेच्या रस्त्यासाठी माजी आ. विजयराव औटिंकडून २ कोटी ३६ लाखांचा निधी मंजूर

ना. औटींची शब्दपूर्ती ; धोत्रे ग्रामस्थांकडून ना. औटींचे आभार



पारनेर प्रतिनिधी


पारनेर तालुक्यातील धोत्रे बुद्रुक ते धोत्रे खुर्द रस्त्याचा अनेक वर्षे प्रलंबित प्रश्न ना. विजयराव औटी  यांनी मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेच्या माध्यमातून 2018 साली तत्वतः मान्यता घेऊन आता प्रत्यक्ष कामाची निविदा देऊन दोन कोटी 36 लाख 37 हजार निधी मंजूर केला आहे. 


ना. औटी यांनी धोत्रे ग्रामस्थांना दिलेल्या रस्त्याच्या कामाचा शब्द पूर्ण केला असून ते आमदार नसताना देखील या गावाला निधी देऊन शब्दपूर्ती केल्याबद्दल धोत्रे गावातील ग्रामस्थांच्या वतीने समाधान व्यक्त करण्यात आले. मा नामदार साहेब यांनी दिलेला शब्द पूर्ण केला याबद्दल धोत्रे ग्रामस्थांच्या वतीने माजी सरपंच बाबासाहेब सासवडे, माजी उपसरपंच अरुणा ताई साळवे, ग्रामपंचायत सदस्य अर्चनाताई नाईकवाडी, माजी ग्रामपंचायत सदस्य लहानुबाई गांगुर्डे, माजी सदस्य माजी सरपंच नंदकुमार भांड,  त्रिंबक भांड, शेखर भांड, शिवसेना शाखाप्रमुख राजू सासवडे, शाखाप्रमुख धोत्रे खुर्द, पोपट सासवडे, दत्तात्रय रहाणे, शिवसैनिक सुभाष सासवडे, बाळासाहेब नाईकवाडी, दत्तात्रेय सासवडे, बाबासाहेब मंचरे, नानासाहेब कोळेकर, गजानन कोळेकर, कैलास गांगुर्डे, नामदेव गांगुर्डे यांनी आभार व्यक्त केले.

Post a Comment

0 Comments