शिवसेना हा सामाजिक बांधिलकी जपणारा पक्ष - डॉ पठारे सर्वमान्यांच्या सुखदुःखात शिवसेना नेहमी अग्रेसर

 


शिवसेना हा सामाजिक बांधिलकी जपणारा पक्ष - डॉ पठारे


सर्वमान्यांच्या सुखदुःखात शिवसेना नेहमी अग्रेसर - डॉ पठारे


पारनेर प्रतिनिधी


सर्वसामान्यांच्या सुखदुःखात सहभागी होऊन अडीअडचणी सोडवण्यासाठी शिवसेना पक्ष नेहमी अग्रेसर असतो असे प्रतिपादन पारनेर पंचायत समिती सदस्य डॉ. श्रीकांत पठारे यांनी केले.

     हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने व शिवसेना पक्षप्रमुख मा. मुख्यमंत्री उद्धवसाहेब ठाकरे यांच्या प्रेरणेने व शिवसेना व लोककल्याण आरोग्य केंद्र मुंबई-ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने पारनेर तालुक्यातील पिंपळनेर येथे आरोग्य चिकित्सा व नेत्र परीक्षण चष्मा व औषध वाटप शिबिर घेण्यात आले. या शिबिराचे उद्घाटन पारनेर पंचायत समिती सभापती गणेशजी शेळके, शिवसेना तालुका प्रमुख विकास रोहकले व पंचायत समिती सदस्य डॉ श्रीकांत पठारे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी बोलताना डॉ पठारे म्हणाले की, तालुक्यात सध्या शिवसेनेच्या वतीने विकासकामांची उदघाटने पार पडत आहेत. रक्तदान शिबिर, डोळे तपासणी शिबीर, याखेरीज सर्वरोग निदान शिबीर, व अपघात समयी मदत करणे आदी सामाजिक कामासाठी शिवसेनेचे पदाधिकारी व शिवसैनिक नेहमी तत्पर असतात. शिवसेना हा सामाजिक बांधिलकी जपणारा पालाश असल्याचे मत डॉ श्रीकांत पठारे यांनी व्यक्त केले.


    यावेळी उपस्थित सरपंच सुभाष गाजरे, उपसरपंच राजू रासकर, कॉ. सुरेश व्होले, एम बी रासकर सर, आर बी रासकर सर, शैलेंद्र गाजरे, शशि पोटे, अक्षय पोटे आदींसह पिंपळनेर चे ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments