![]() |
| आकाश काळे |
पिंपरी जलसेन येथील युवकाचे अपहरण केले प्रकरणी 3 जणांवर गुन्हा दाखल
पिंपरी जलसेन
पिंपरी जलसेन येथील आकाश बबन काळे या युवकाला अपहरण करून ५० हजार रुपये खंडणी मागितले प्रकरणी व लोखंडी गजाने मारून जीवे मारण्याचा प्रयत्न केलेप्रकारणी पारनेर येथील सचिन बाबाजी बोरुडे, अशोक बोरुडे, संग्राम चंद्रकांत कावरे यांच्यावर पारनेर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत सविस्तर असे की,गेल्या आठवड्याभरापूर्वी पिंपरी जलसेन येथील एक युवकाचा चिंचोली येथे पठारवाडीच्या वयस्कर व्यक्तीस मोटरसायकलचा धक्का लागला होता. सदरचे प्रकरण मिटले देखील होते. सदरचा प्रकार मिटविण्यासाठी आकाश काळे हा सोबत आला होता याचा राग मनात धरून पिंपरी जलसेन येथील आकाश काळे या युवकाला मंगळवारी रात्री ८:३० च्या सुमारास त्याचे राहते घरातून इनोव्हा गाडीतून अपहरण करण्यात आले. त्याला काठी व लोखंडी गजाने मारहाण करूण्यात आली. यात त्याचा हात मोडला व त्याच्याकडून ५० हजार रुपये खंडणी मागण्यात आली. व त्याला हत्तलखिंडी भागात सोडण्यात आले. घटनेची माहिती मिळताच पारनेरचे पोलीस निरीक्षक घनश्याम बळप, पोलीस उपनिरीक्षक विजयकुमार बोत्रे यांनी घटनास्थळी भेट देऊन आकाश काळे याला रुग्णालयात दाखल केले. आकाश काळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पारनेर येथील सचिन बाबाजी बोरुडे, आकाश बोरुडे व संग्राम चंद्रकांत कावरे यांच्याविरुद्ध अपहरण करून खंडणी मागणे, जीवे मारण्याचा प्रयत्न करणे आदी कलमाखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक विजयकुमार बोत्रे हे करत आहेत.

0 Comments