निघोज येथे शनिवारी लोकमत व कन्हैय्या उदयोग समुहाकडुन भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन
निघोज प्रतिनिधी
लोकमतचे संपादक स्वांतञ्यसेनानी स्व.जवाहारलाल ऊर्फ बाबुजी दर्डा यांच्या पुण्यतिथीनिम्मत " लोकमत रक्ताच नात" या मोहिमेसे कन्हैय्या उदयोग समुहाने उत्सफुर्त सहभाग घेत असल्याची माहीती कन्हैय्या डेअरी फार्मचे सर्वेसर्वा मच्छिंद्र लंके यांनी दिली.
रक्तदात्यांना लोकमत व कन्हैय्या उदयोग समुहाकडुन विशेष सन्मान पञ व विशेष भेट देण्यात येणार आहे.रक्तदान शिबिराचे उदघाटन कन्हैय्या उदयोग समुहाचे संस्थापक शांताराम लंके हे करणार आहेत.कन्हैय्या दुध उदयोग समुहाने हजारो शेतकरी व हजारो तरुणांना रोजगार उपलब्ध करुन दिलेला आहे.कन्हैय्या डेअरी फार्म दरवर्षी भव्य सप्ताहाचे आयोजन करुन किर्तनकारांच्या माध्यमातुन धार्मिक प्रबोधन करुन लाखो भाविकांना महाप्रसादाचे आयोजन करीत आहे.परंतु कोरोनामुळे सप्ताहा बंद आहे.कोरोनाच्या काळात रक्ताचा तुटवडा भासत आहे.लोकमतने लोकमत रक्ताच नात हा सुरु केलेला उपक्रम नक्कीच देशासाठी दिशादर्शक आहे. यामुळे लाखो रुग्णांना दिलासा मिळणार आहे.त्यामुळे कन्हैय्या उदयोग समुह यामध्ये सहभागी होवुन समाजाप्रती आपली बांधिलकी जपणार असल्याची माहीती चेअरमन मच्छिंद्र लंके यांनी दिली.


0 Comments