जि. प सदस्य दाते सरांनी विकासकामांचा रथ पारनेर तालुक्यात आणला - डॉ श्रीकांत पठारे

 जि. प सदस्य दाते सरांनी  विकासकामांचा रथ पारनेर तालुक्यात आणला - डॉ श्रीकांत पठारे

राज्यात सत्तेत असणाऱ्या महाविकास आघाडीच्या सरकारमुळेच एवढा निधी आणणे शक्य झाले - काशीनाथ दाते

जिल्हा परिषदेच्या माध्यमातून गावच्या सर्वांगीण विकासासाठी निधी देणार - अ‍ॅड . आझाद ठुबे

पारनेर तालुक्यात दाते सरांच्या माध्यमातून विकासगंगा - सभापती गणेश शेळके.


चंद्रकांत कदम पारनेर


माजी आमदार विजयराव औटी  विधानसभेचे उपाध्यक्ष झाले तेव्हा जेव्हढे विकासकामे पारनेर तालुक्यात सुरू होते, तेवढेच विकास कामे आता जिल्हा परिषद सदस्य व बांधकाम समितीचे सभापती काशीनाथ दाते सरांच्या माध्यमातून सुरू आहेत. दाते सरांच्या माध्यमातून विकासकामांचा रथ पारनेर तालुक्यात आणण्याचे काम केले असल्याचे मत पारनेर पंचायत समिती सदस्य डॉ श्रीकांत पठारे यांनी व्यक्त केले.

         


ग्रामपंचायत जनसुविधेअंतर्गत जि. प सदस्य काशीनाथ दाते यांच्या निधीतून पारनेर तालुक्यातील सांगवी सूर्या येथे ५ लक्ष रुपयांच्या पेव्हिंग ब्लॉक उदघाटन सोहळा पार पडला. कार्यक्रमाच्या निमित्ताने जि. प सदस्य काशीनाथ दाते, माजी जिल्हा परिषद सदस्य ऍड आझाद ठुबे, पंचायत समिती सभापती गणेश शेळके, पंचायत समिती सदस्य डॉ. श्रीकांत पठारे, शिवसेना तालुकाप्रमुख विकास रोहोकले, मंगेश सालके, राहुल तामखडे, कान्हूर पठाराचे उपसरपंच सागर व्यवहारे आदी मान्यवर उपस्थित होते.

    यावेळी बोलताना जिल्हा परिषद सदस्य काशीनाथ दाते सर म्हणाले की, राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असल्याने जिल्हा परिषदेमध्ये बांधकाम समितीचे सभापतीपद माझ्याकडे आले. आणि यामुळेच मी तालुक्याभरात विकासकामांची गंगा अनु शकलो. मी बांधकाम समितीच्या सभापतीपदाच्या माध्यमातून पारनेर तालुक्यासह अहमदनगर जिल्ह्यातील इतर तालुक्यांतील सर्वच जिल्हा परिषद गटांत विकास केले असल्याचे प्रतिपादन दाते यांनी  व्यक्त केले.  पंचायत समिती सभापती गणेश शेळके म्हणाले की, विजयराव औटी साहेबांच्या नंतर दाते सरांच्या माध्यमातून विकासाची गंगा पारनेर तालुक्यात आणली. तालुक्यात दररोज विकासकामांचे उदघाटन सुरू आहेत. राज्यात शिवसेनेचे मुख्यमंत्री असून तालुक्याला विकासकामांसाठी निधीची कमतरता पडणार नसल्याचे मत सभापती गणेश शेळके यांनी व्यक्त केले. माजी जिल्हा परिषद सदस्य ऍड आझाद ठुबे म्हणाले की,जिल्हा परिषदेच्या माध्यमातून गावच्या सर्वांगीण विकासासाठी निधी देण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे ठुबे यांनी सांगितले.

   यावेळी सरपंच कल्पना आढाव, उपसरपंच अश्विनी कोठावळे, भाऊसाहेब नाना आढाव, विठ्ठल कोठावळे,मोहन आढाव, अशोक कोठावळे, ईश्वर आढाव, शरद कोठावळे, संतोष आढाव, प्रकाश कोठावळे, भाऊसाहेब झंझाड, केतन कोठावळे(माजी सरपंच), सुनील कोठावळे, मारुती मादनकर, ओंकार नगरे, वैभव आढाव, रोहिदास धुमाळ, भास्कर कोठावळे, अरुण आढाव, सोनू गाडे, ग्रा.प सदस्य लक्ष्मण आढाव, विलास कोठावळे, पोपट आढाव, मोहन झंझाड, भानुदास नगरे, चंद्रकांत कोठावळे, महेश म्हस्के, अंकुश म्हस्के,  विलास साठे, रामदास कोठावळे, शिवाजी कोठावळे, नारायण साठे, आशिष म्हस्के, आनंदा कोठावळे, सुदाम मादनकर, अरुण साठे आदी उपस्थित होते.



जिल्हा परिषदेच्या माध्यमातून तालुक्याभरात कोट्यवधी रुपयांचा निधी आणला आहे. मी कधीही याचे श्रेय घेत नसून ज्या त्या गटातील जिल्हा परिषद सदस्य व गणातील पंचायत समिती सदस्यांना याचे श्रेय देत असल्याचे जिल्हा परिषद सदस्य काशीनाथ दाते सर यांनी सांगितले.

Post a Comment

0 Comments