संदीप झंझाड यांना एलआयसीचा सलग ५ वा पुरस्कार

 


संदीप झंझाड यांना एलआयसीचा सलग ५ वा पुरस्कार

पारनेर प्रतिनिधी

एलआयसी ऑफ इंडिया यांच्यावतीने देण्यात येणारा एम.डी.आर.टी पुरस्कार संदीप भाऊसाहेब झंझाड यांना नुकताच देण्यात आला. झंझाड यांनी केलेले काम व विमा व्यवसायात अनेक कुटुंबांना विमा कवच देऊन ग्राहकांचा विश्वास संपादन केलेल्या कामाची दखल घेऊन झंझाड यांना सलग पाचव्यांदा हा पुरस्कार एलआयसी कडून देण्यात आला.

मायादी बीच फ्लोरिडा अमेरिका येथे होणाऱ्या विमापरिषदेसाठी एलआयसी ऑफ इंडिया ने त्यांची सलग पाचव्यांदा निवड केली आहे. याबद्दल झंझाड यांचे ब्रँच मॅनेजर विश्वास गंगाखेडकर, भुजंग साहेब, एमएमओ मॅनेजर चांभारे साहेब, विकास अधिकारी धनंजय देशमुख, चिंचोलीचे सरपंच योगेश झंझाड, गांजिभोयरे सरपंच आनंदराव झंझाड, माजी सरपंच डॉ आबासाहेब खोडदे, संतोष खनसे,मोहन शिंदे, गंगाराम महाराज खोडदे, बाळू तुकाराम खोडदे, आयुब इनामदार, पिंपरी जलसेनचे माजी सरपंच राजेंद्र थोरात, उद्योजक श्रीकांत खोडदे, प्रकाश शेंडकर, ठकाराम खोडदे, आकाश पडवळ, शरद पांढरे, बाबासाहेब खोडदे, गोरख खनसे, कांदा व्यापारी राजू झंझाड, सागर पडवळ, सुदर्शन लाळगे, रावसाहेब झंझाड, तसेच हनुमान जन्मोत्सव सोहळा समिती व श्री आंचलेश्वर पतसंस्था परिवार, चिंचोली, पारनेर, गांजिभोयरे, लोणीमावळा, पिंपरी जलसेन, निघोज येथील ग्रामस्थांकडून संदीप झंझाड यांचे अभिनंदन करण्यात आले.

Post a Comment

0 Comments