मुळा नदीचे आवर्तन पूर्ण दाबाने सोडा : सरपंच प्रकाश गाजरे




मुळा नदीचे आवर्तन पूर्ण दाबाने सोडा : सरपंच प्रकाश गाजरे

------------

  शिष्टमंडळाद्वारे आमदार निलेश लंके यांच्याकडे मागणी

-------------

  प्रश्न मार्गी लावण्यासाठी आमदार निलेश लंके यांनी सुरू केला पाठपुरावा



 पारनेर प्रतिनिधी :

 पारनेर तालुक्यातील उत्तर भागातील पोखरी, वारणवाडी,  म्हसोबाझाप, पळसपुर मांडवे, देसवडे या गावांना पिंपळगाव खांड धरणाचे मुळा नदीचे आवर्तन पूर्ण दाबाने मिळत नसल्यामुळे हे आवर्तन पूर्ण दाबाने सोडण्याची मागणी म्हसोबा झाप ग्रामपंचायतीचे नवनिर्वाचित सरपंच प्रकाश गाजरे यांनी शिष्टमंडळा द्वारे आमदार निलेश लंके यांच्याकडे निवेदन देऊन केली आहे. 

 यावेळी आमदार निलेश लंके यांनी स्वतः संबंधित प्रशासकीय अधिकाऱ्यां बरोबर चर्चा केली असून हा प्रश्‍न लवकरच मार्गी लावण्याचे आश्वासन दिले आहे.

  पिंपळगाव खांड धरणाचे  मुळा नदीच्या आवर्तन पूर्ण दाबाने मिळाल्यास पारनेर तालुक्यातील उत्तर भागातील जवळजवळ 15 हजार हेक्टर क्षेत्र  100% नव्याने ओलिताखाली येण्यास मदत होणार आहे. 

 त्यामुळे  म्हसोबाझाप, पळसपुर, वारणवाडी, पोखरी, देसवडे, मांडवे या गावांच्या शेतीचा पाण्याचा प्रश्न मार्गी लागणार आहे. 

 दरम्यान यावेळी  सरपंच प्रकाश गाजरे यांच्या समवेत सिताराम पवार, गणेश शिंदे, जयराम आहेर, बाबुराव आहेर, अर्जुन पिंगळे, जयराम आहेर बाळासाहेब शिंदे, योगेश पवार, नामदेव करंजेकर, अशोक आहेर, साहेबराव करंजेकर,आदी शेतकरी उपस्थित होते.


 

 

पारनेर तालुक्यातील उत्तर भागातील आदिवासी पट्ट्यात येणाऱ्या पोखरी, म्हसोबाझाप, वारणवाडी, पळसपुर, देसवडे, मांडवे या गावांना पिंपळगाव खांड धरणाचे शेवटचे आवर्तन मिळत नाही. त्यामुळे हे आवर्तन मिळाले पाहिजे अशी आमची मागणी आहे. त्या माध्यमातून या परिसरातील जवळजवळ 15 हजार हेक्‍टर क्षेत्र नव्याने ओलिताखाली येण्यास मदत होणार आहे. आमदार निलेश लंके यांच्या माध्यमातून आम्ही हा पाठपुरावा आता शासनाकडे करत आहोत.  (सरपंच प्रकाश गाजरे, म्हसोबाझाप ग्रामपंचायत)

Post a Comment

0 Comments