म्हसोबा झाप येथे नेत्र तपासणी व मोतिबिंदू शस्त्रक्रिया शिबीर.
97 लोकांची तपासणी 13 लोकांवर होणार शस्त्रक्रिया
म्हसोबाझाप सरपंच प्रकाश गाजरे यांची माहिती
रुग्ण सेवा हीच ईश्वर सेवा : सरपंच प्रकाश गाजरे
आमदार निलेश लंके यांच्या रुग्णसेवेची प्रकाश गाजरे यांना प्रेरणा
पारनेर प्रतिनिधी :
पारनेर तालुक्यातील उत्तर भागातील म्हसोबाझाप ग्रामपंचायत, रंगदास स्वामी मंदिर कन्हेर या ठिकाणी रविवार दिनांक 25 जुलै रोजी आमदार लोकनेते निलेश लंके साहेब यांच्या मार्गदर्शनाने व्ही. एच. देसाई नेत्र रुग्णालय, मंहमदवाडी, हडपसर, पुणे यांच्या विशेष सहकार्याने सरपंच प्रकाश तुकाराम गाजरे यांच्या विशेष प्रयत्नातून मोफत मोतीबिंदू भिंगरोपन व बिन टाक्याचे ऑपरेशन शिबिर व डोळे तपासणी व अल्पदरात चष्मे वाटप शिबीर आयोजित करण्यात आले होते. याप्रसंगी हरी रोहकले, पांडुरंग आहेर, विलास गाजरे, विलास आहेर, झुंबर दरेकर, बन्सी आरोटे, लहू वाळुंज, ज्ञानदेव बेलकर, बाळासाहेब वाळुंज, बबन गिरी, अक्षय रोहकले, सावकार रोहकले, रोहिदास दरेकर, मारुती आरोटे, पांडुरंग जाधव, पोपट वाघ, माऊली जाधव आदी ग्रामस्थ उपस्थित होते.
कन्हेर म्हसोबा झाप येथे घेण्यात आलेल्या शिबिरामध्ये 97 लोकांची तपासणी करण्यात आली यामध्ये 13 लोकांवर मोफत शस्त्रक्रिया होणार आहेत.
अशी माहिती म्हसोबाझाप ग्रामपंचायतीचे सरपंच प्रकाश तुकाराम गाजरे यांनी दिली आहे.
यावेळी बोलताना सरपंच प्रकाश गाजरे यांनी सांगितले की आपले डोळे हे शरीरातील अत्यंत महत्वाच्या अवयवांपैकी एक आहेत. त्यांची काळजी घेणे फार गरजेचे आहे. डोळ्यांचे आरोग्य सांभाळा, टीव्ही आणि मोबाईल पासून चार हात दूर राहा असा सल्ला दिला.
दरम्यान या शिबिरासाठी म्हसोबा झाप, पोखरी, वारणवाडी, कामटवाडी, पळसपुर, काटाळवेढा सावरगाव परिसरातील अनेक ग्रामस्थांनी या शिबीराचा लाभ घेतला.
दरम्यान या कार्यक्रमासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, आमदार निलेश लंके प्रतिष्ठान, पारनेर तालुका व संघर्ष ग्रुप तसेच म्हसोबा झाप ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य यांचे विशेष सहकार्य लाभले.
रुग्ण सेवा हीच ईश्वर सेवा : सरपंच प्रकाश गाजरे
पारनेर तालुक्यातील उत्तर भागातील म्हसोबाचा कन्हेर ग्रामपंचायत सरपंच प्रकाश गाजरे आपल्या आदिवासी भागासाठी विविध सामाजिक उपक्रम राबवत आहेत. म्हसोबा झाप याठिकाणी आरोग्य शिबिर घेऊन आदिवासी समाजातील दीन दलित गरीब कुटुंबांची ते एक प्रकारे सेवा करत आहेत रुग्ण सेवा हीच ईश्वर सेवा हे ब्रीद घेऊन सरपंच प्रकाश गाजरे आदिवासी भागात काम करत आहेत.
आमदार निलेश लंके यांच्या रुग्णसेवेची प्रकाश गाजरे यांना प्रेरणा
आदिवासी भागामध्ये काम करत असताना आपण आदिवासींचे प्रश्न सोडवले पाहिजे ही भावना मनात ठेवून सरपंच प्रकाश गाजरे काम करत आहेत. पारनेर तालुक्याचे आमदार निलेश लंके यांनी कोरोना काळात कोरोना रुग्णांची केलेली सेवा ही सरपंच प्रकाश गाजरे यांच्या पुढे प्रेरणा आहे. त्यामुळे ते आदिवासी भागामध्ये आता विविध आरोग्यविषयक शिबिरे घेत आहेत व आपल्या गरीब दलित समाजाची सेवा करत आहेत.

0 Comments