झाडे दत्तक घेऊन संगोपन करण्याचा तरुणांचा संकल्प - जगदाळे
वडनेरमध्ये रस्त्याच्या दुतर्फा जंगली झाडांची लागवड
पारनेर प्रतिनिधी
पारनेर तालुक्यातील वडनेर बु. येथील गुरुदत्त वृक्षारोपण आणि वृक्षसंवर्धन समितीच्या पुढाकाराने व ग्रामस्थांच्या सहकार्याने वडनेर ते बाबरमळा रस्त्याच्या दुतर्फा वृक्षारोपण करण्यात आले. यात मुख्यतः जंगली झाडांची लागवड करण्यात आली असून झाडांना संरक्षक जाळ्याही लावण्यात आल्या आहेत. ही सर्व झाडे आम्ही दत्तक घेणार असून या सर्व झाडांच्या संगोपनाची जबाबदारी समितीच्या सभासदांनी उचलली आहे. तसेच भविष्यातही अनेक ठिकाणी वृक्षारोपण करण्यात येणार असल्याचे समितीचे मुख्य संयोजक उत्कर्ष जगदाळे यांनी सांगितले.
या उपक्रमासाठी गावातील अनेक दानशूर व्यक्तींनी आर्थिक मदत केली असून ग्रामसमृध्दी फाऊंडेशन आणि पारनेर तालुका परिवर्तन या सामाजिक संस्थांनी रोपे उपलब्ध करून दिली होती.
सदर उपक्रम यशस्वी होण्यासाठी ऋषिकेश जगदाळे, उत्कर्ष जगदाळे, स्वप्नील जगदाळे, विशाल जगदाळे, अमोल जगदाळे, आकाश जगदाळे, तेजस जगदाळे, ओंकार जगदाळे, गोरक्ष जगदाळे, राम बोऱ्हाडे, तन्मय जगदाळे, स्वराज जगदाळे, सोहम जगदाळे, आर्यन जगदाळे, सार्थक जगदाळे, अथर्व जगदाळे, सेजल जगदाळे यांनी विशेष परिश्रम घेतले.
यावेळी सरपंच राहुल सुकाळे, पारनेर परिवर्तनचे विक्रम पारखे, विकास वाजे, स्वातीताई नऱ्हे, ग्रा. पं. सदस्य राहुल बाबर, अनिल नऱ्हे, सुनील बाबर, दत्तात्रय वाजे, नवनाथ सुकाळे, प्रतिक येवले, विकास बाबर, विजय चौधरी, तुषार चौधरी आदी उपस्थित होते.
वृक्षारोपण आणि संवर्धन ही काळाची गरज आहे हे ओळखून वडनेरकर झटत आहे ही नक्कीच समाधानाची बाब आहे. परीवर्तन वृक्षारोपण उपक्रमांतर्गत तालुकाभर वृक्षारोपण होत असून आजवर दहा हजार वृक्षांची लागवड केली गेली आहे. भविष्यातही अशा उपक्रमासाठी परिवर्तनचा नेहमी पाठिंबा असेल.
विक्रम पारखे, विकास वाजे
पारनेर तालुका परिवर्तन फाऊंडेशन

0 Comments