मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त पारनेर येथे कोव्हीड सेंटरमधील रुग्णांना खाद्यपदार्थांचे वाटप


 मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त पारनेर येथे कोव्हीड सेंटरमधील रुग्णांना खाद्यपदार्थांचे वाटप

पारनेर प्रतिनिधी

महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री ना. उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त पारनेर येथील पूर्णवाद भवन येथील कोव्हिड सेंटरमधील रुग्णांना खाद्यपदार्थांचे वाटप करण्यात आले. पारनेर मध्ये सामाजिक उपक्रम राबवून डॉ श्रीकांत पठारे मित्र परिवार व पारनेर तालुका शिवसेनेच्या वतीने ना. उद्धव ठाकरे यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला.

         ८० टक्के समाजकारण व २० टक्के राजकारण या "शिवसेनेच्या ध्येय धोरणावर प्रेरित होऊन" पारनेर तालुक्यात शिवसेना काम करत आहेत. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री शिवसेनेचे पक्षप्रमुख ना. उद्धवसाहेब ठाकरे यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रमांनी साजरा करण्यात आला. शिवसेनेचे पंचायत समिती सदस्य डॉ श्रीकांत पठारे यांच्या मार्गदर्शनाखाली हा वाढदिवस साजरा करण्यात आला.  पारनेर येथील डॉ श्रीकांत पठारे संचलित पूर्णवाद भवन येथील कोव्हीड सेंटरमधील रुग्णांना खाद्यपदार्थांचे वाटप करण्यात आले.  यावेळी शिवसेनेचे पंचायत समिती सदस्य डॉ श्रीकांत पठारे, संपत पाटील सालके, शिवसेना गणप्रमुख मंगेश पाटील सालके, गोरख पाटील सालके, शुभम पठारे, नवनाथ खामकर, ईश्वर आढाव, संतोष पठारे, अक्षय कदम, अमोल ठुबे, वडूलेचे संतोष रासकर, रांधेचे उपसरपंच सागर मुळे, अमोल गजरे, आदिनाथ कदम, बाभुळवाडेचे दिलीप बोरुडे आदी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments