“आमचे प्रेरणास्थान सहकार रत्न कै.सॉलिसिटर गुलाबरावजी शेळके साहेब..”

 “आमचे प्रेरणास्थान सहकार रत्न कै.सॉलिसिटर गुलाबरावजी शेळके साहेब..”

लेखक - समीर पठाण यांच्या लेखणीतून 


  महाराष्ट्रात सहकार क्षेत्रात आपले संपूर्ण आयुष्य वाहून घेणारे आणि जी.एस महानगर बँकेचे संस्थापक अध्यक्ष सहकार रत्न कै. सॉलिसिटर गुलाबरावजी शेळके साहेब यांची आज जयंती.९ जून १९४२ रोजी सॉ.गुलाबरावजी शेळके साहेब यांचा जन्म पारनेर तालुक्यातील पिंपरी जलसेन या छोट्याशा गावात झाला.लहानपणी अत्यंत गरीब परिस्थितीत साहेब वाढले. साहेबांनी सुरुवातीचे शिक्षण आपल्या गावीच पूर्ण केले आणि पुढील शिक्षणासाठी ते मुंबईला आले.त्या ठिकाणी त्यांनी स्वतः काम करून व रात्रशाळेत शिक्षण घेऊन आपले उर्वरित शिक्षण पूर्ण केले. न्याय क्षेत्रातील सॉलिसिटर ही उच्च पदवी साहेबांनी मिळवली,स्वतः गरिबी अनुभवलेली असल्याने साहेबांना समाजातील गरीब आणि शोषित लोकांवर विशेष प्रेम होते, म्हणूनच साहेब नेहमी सांगत की 'अन्याय सहन करायचे नाही'. साहेब हे प्रेम, त्याग आणि चारित्र्य संपन्न व्यक्तिमत्त्वाचे मूर्तिमंत प्रतीक होते.समाजाचे आपण काही देणे लागतो आणि त्यासाठी आपण काही तरी केले पाहिजे या उद्देशाने साहेबांनी गरीब लोकांची सावकारा मार्फत होणारी पिळवणूक थांबवण्यासाठी साहेबांनी ६  ऑक्टोबर १९७३ रोजी महानगर बँकेची स्थापना केली आणि या बँकेमार्फत समाजातील प्रत्येक घटकाला मदत कशी करता येईल याची नेहमी काळजी घेतली.साहेब हे प्रेमाचे महासागर होते साहेबांजवळ आलेली प्रत्येक व्यक्ती ही शेवटपर्यंत साहेबांसोबतच राहिले. सहकार क्षेत्रात साहेबांनी आपले संपूर्ण आयुष्य वाहून दिले,प्रामाणिकपणा हा गुण साहेबांच्या रक्तातच होता म्हणून साहेबांनी शेवटपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार साहेब यांच्याशी आणी पक्षाशी एकनिष्ठ राहिले ,आदरणीय साहेबांच्या जाण्याने सहकार क्षेत्रात खूप मोठी पोकळी निर्माण झाली आहे मात्र अभिमानाने नमूद करावे वाटते की आज साहेबांनी केले तेच काम आणि विशेष म्हणजे साहेबांचे प्रत्येक स्वप्न पूर्ण करण्याचे काम आज अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेचे अध्यक्ष आणि जी.एस महानगर बँकेचे अध्यक्ष ॲड. उदय दादा शेळके साहेब आणि त्यांचे कुटुंब करत आहे.याचा आम्हाला खूप खूप अभिमान वाटतो आज साहेबांची जयंती त्यांच्या जयंती निमित्त पिंपरी जलसेन ग्रामस्थ आणि जी.एस. महानगर बँक परिवार तर्फे कोटी कोटी विनम्र अभिवादन.


  शब्दांकन:-समीर पठाण..


Post a Comment

0 Comments