मोहन कवाद यांचे सर्व्हिस सेंटर जळल्यामुळे ५७ हजारांची आर्थिक मदत
आपण सामाजिक जीवनात कितीही सक्षम असलो तरी संकटामध्ये मदत प्रोत्साहन देत असते -- (जीवनात प्रत्येक संकटाचा मुकाबला कराचा असेल तर छञपती शिवाजी महाराजांचा इतिहास वाचा ) -- डाॕ.भास्करराव शिरोळे
पारनेर प्रतिनिधी
निघोज ता.पारनेर येथील मोहन जयवंत कवाद यांचे जिजामाता सर्व्हिस सेंटर आकस्मात जळाल्याचे समजल्यामुळे वैदयकिय क्षेत्रात सामाजिक बांधिलकी जपणारे डाॕ.भास्करराव शिरोळे , उदयोजक गणेश कवाद ,लोकमत तालुका प्रतिनिधी विनोद गोळे मिञपरिवार उदयोजक धीरज महांडुळे ,रायभान औटी , कल्याणराव थोरात यां सर्वांनी मिळुन मोहन जयवंत कवाद यांच्या घरी येवुन ५७,५००(सत्तावन्न हजार पाचशे ) रुपयांचे सहकार्य केले. डाॕ.भास्करराव शिरोळे म्हणाले संकट छोटे असो की मोठे एकमेकांना आधार देणे आपले कर्तव्य आहे.सामाजिक जीवनात काम करत असतानी माणसे कवाद कुटुंबांसारखी सरळ जीवन जगणारे कष्टावर विश्वास ठेवणारे माणसे जोडणे मला नेहमीच आवडते.तुम्हांला कोणतीही मदत लागली तर हक्काने आवाज दया.पुणे विदयापीठ बहिःशालचे प्रवक्ते शिवव्याख्याते प्रा.ज्ञानेश्वर कवाद सर म्हणाले आपण सामाजिक जीवनात कितीही सक्षम असलो तरी अशा वेळी केलेली मदत ही आपल्याला संकटांना तोंड देण्यासाठी प्रोत्साहन देत असते हा छञपती शिवाजी महाराजांचा इतिहास असल्याचे सांगितले . लोकमतचे पारनेर तालुकाप्रतिनिधी विनोद गोळे म्हणाले आमच्या सर्व मिञपरिवाराचे पञकार भास्कर कवाद ,व्यावसायिक मोहन कवाद,शिवव्याख्याते प्रा.ज्ञानेश्वर कवाद यांच्या कुटुबांबरोबर आमचे कौटुंबिक जिव्हाळ्याचे सबंध आहे.त्यामुळे घटनेची माहीती समजाताच कवाद कुटुंब प्रत्येक संकटाशी लढण्यास सक्षम असले तरी संकटात एकमेकांना आधार देणे हेच खरे जीवन आहे. उदयोजक ग्रामपंचायत सदस्य गणेश कवाद म्हणाले जीवनात आलेल्या संकटात एकमेकांना सहकार्य करा हेच आमचे चुलते आधारस्तंभ स्व.गंगारामशेठ कवाद हे आम्हांला कायम सांगत असत.त्यांचेच विचार आम्ही जपत आहोत. यावेळी मातोश्री यमुनाबाई कवाद ,पञकार भास्कर कवाद,अक्षय कवाद,अभिजीत कवाद,आदित्य कवाद,तेजस कवाद ,सत्यम कवाद,शिवम कवाद,गौरव कवाद,मनोज डेरे,ज्योती कवाद,राजश्री कवाद, अर्चना कवाद उपस्थितीत होते.कवाद कुटुंबाच्या वतीने अक्षय कवाद यांनी सर्वांचे आभार मानले.
जीवनात आमच्या कुटुंबानी अनेक मोठीमोठी संकटे पाहीलीत आमच्यासाठी हे संकट काहीच नाही.खचुन न जात संकटाशी लढण्याची तयारी ठेवा आज ना उदया मार्ग निघोतच. (मातोश्री यमुनाबाई कवाद )

0 Comments