२००० बॅचच्या दहावीच्या माजी विद्यार्थ्यांकडून संदीप पाटील वराळ कोव्हीड सेंटरला ४३ हजारांची देणगी

निघोज येथील २००० बॅचच्या माजी विद्यार्थ्यांनी संदीप पाटील वराळ आरोग्य मंदीर कोव्हिड सेंटरला ४३ हजार ५८७ रुपयांची देणगी.


पारनेर प्रतिनिधी 

संदीप पाटील वराळ आरोग्य मंदीर कोव्हिड सेंटरच्या माध्यमातून कोरोना हद्दपार करण्यासाठी संदीप पाटील वराळ जनसेवा फौंडेशन व निघोज ग्रामस्थ यांचे प्रयत्न सार्थकी असल्याचे प्रतिपादन माउली मळगंगा उद्योग समूहाचे संस्थापक अध्यक्ष ज्ञानेश्वर उर्फ माउलीशेठ तनपुरे यांनी  बोलताना व्यक्त केले.दहावीच्या २००० बॅचच्या माजी विद्यार्थ्यांनी संदीप पाटील वराळ आरोग्य मंदीर कोव्हिड सेंटरला ४३ हजार ५८७ रूपयांची देणगी संदीप पाटील वराळ जनसेवा फौंडेशनचे तालुका अध्यक्ष सचिन पाटील वराळ यांच्याकडे सुपूर्द केली.यावेळी तनपुरे  बोलताना म्हणाले गाव व परिसर मोठा आहे.पंचक्रोशीत गावांची संख्या जास्त आहे.म्हणून या ठिकाणी कोव्हिड सेंटरची खऱ्या अर्थाने गरज होती.ती पुर्ण करण्याचे काम संदीप पाटील वराळ जनसेवा फौंडेशन व निघोज ग्रामस्थ यांनी केले आहे.फौडेंशननने या कोव्हिड सेंटर माध्यमातून सेवाभाव करीत संदीप पाटील वराळ यांचे सेवाभावी स्मरण केले आहे.अशाप्रकारे यापुढील काळात आरोग्यदूत म्हणून फौंडेशनच्या सदस्यांनी काम करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन तनपुरे यांनी व्यक्त केले आहे.ग्रामपंचायतचे माजी सदस्य भिमराव लामखडे यांनी या भागातील लोकसंख्येचा विचार करता ग्रामीण रुग्णालयाची गरज असून त्यादृष्टीने ग्रामपंचायत पदाधिकारी व संदीप पाटील वराळ जनसेवा फौंडेशन यांनी पाठपुरावा करण्याची मागणी केली. या देणगीसाठी लहू गागरे ,भिमा लामखडे ,माऊली तनपुरे ,सुनील वराळ ,ज्ञानेश्वर वाढवने ,संदीप वाघमारे ,मच्छिंद्र लामखडे ,

गणेश निघोजकर ,जनार्दन पवार ,दिलीप गुंड ,सूर्यकांत गुंड ,अमोल फ़ाक़टकर ,सुहास शेटे ,स्वप्निल उनवने ,बबन सोनवणे ,सुभाष लाळगे,अनिल रासकर ,विनायक झावरे ,राहुल उनवने ,प्रशांत रसाळ ,संजय लेंभे ,संतोष गुंड ,धनाजी लामखडे ,रोहिदास लामखडे,राजू गायखे ,

सुखदेव रासकर आदींनी योगदान दिले आहे.यामध्ये शासकीय अधिकारी, पोलिस अधिकारी, बॅंक अधिकारी, व्यवसायीक, व्यापारी, सामाजिक कार्यकर्ते, राजकीय कार्यकर्ते आदिंचा समावेश आहे.दहावीच्या या माजी विद्यार्थ्यांनी देणगी दिल्याबद्दल संदीप पाटील वराळ जनसेवा फौंडेशन व निघोज ग्रामस्थ यांनी त्यांचे धन्यवाद व्यक्त करीत आभार मानले आहेत.


जळगाव जिल्ह्यातील सहाय्यक पोलीस निरीक्षक स्वप्नील कचरदास उनवणे यांनी या दहावीच्या माजी विद्यार्थी बॅचमधून देणगी दिली असून यापुर्वीही पारनेर तालुका पत्रकार संघाचे ज्येष्ठ मार्गदर्शक दत्ता उनवणे यांच्या वाढदिवसानिमित्त दि.१६ मे रोजी ५ हजार ५५५ रुपयांची देणगी दिली आहे.तसेच त्यांचे वडील, चूलते व उनवणे कुटुंबातील सदस्यांनी सुद्धा देणगी दिली आहे.उनवणे परिवाराने या कोव्हिड सेंटरला आज पर्यंत ११ हजार रूपयांपेक्षा जास्त देणगी दिल्याबद्दल संदीप पाटील वराळ जनसेवा फौंडेशनचे तालुका अध्यक्ष सचिन पाटील वराळ यांनी सर्व देणगीदरांना धन्यवाद व्यक्त करीत आभार मानले आहेत.

Post a Comment

0 Comments