![]() |
| शिवस्वाराज्य दिनानिमित्त रक्तदान शिबीर व विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. |
पारनेर प्रतिनिधी
शिवरायांचे कार्य हे सातासमुद्रापार गेले असून या हिंदवी स्वराज्याचे अनुकरण आजच्या युवकांनी करण्याचे आवाहन शिवव्याख्याते प्रा. ज्ञानेश्वर कवाद यांनी केले आहे.निघोज येथील शिवबा संघटनेच्या वतीने शिवस्वाराज्य दिनानिमित्त रक्तदान शिबिर व विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिवबा संघटनेचे अध्यक्ष अनिल शेटे होते.यावेळी शिवबा संघटनेच्या कार्यालयावर भगवा झेंडा शिवबा संघटनेचे अध्यक्ष अनिल शेटे व सहकाऱ्यांच्या हस्ते फडकीवीण्यात आला.यावेळी उपस्थीतांनी जय भवानी जय शिवाजी जय जिजाऊ या घोषनांनी आसमंत दणाणून गेला होता.यावेळी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.यामध्ये रक्तदान शिबीर घेण्यात आले.बहुसंख्य युवकांनी यामध्ये मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला.यावेळी बोलताना शिवव्याख्याते प्रा ज्ञानेश्वर कवाद म्हणाले शिवरारायांनी इतिहास घडवला म्हणून आजची हिंदू संस्कृती जगात मानाने राज्य करीत आहे.शिवबा संघटनेने निघोज व परिसरात शिवउस्तव साजरे करुण धार्मिकता जपली आहे.शिवाय युवकांचे संघटन करीत शिवरायांचा इतिहास घराघरात नेला आहे.यामाध्यमातून हिंदू संस्कृतीचा अमुल्य ठेवा जतन करीत जोपासुन वाढविण्यासाठी प्रयत्न केले असून युवकांनी शिवबा संघटनेच्या कार्यांत सातत्याने सहभागी होऊन सामाजिक कामांशी बांधीलकी ठेउन काम करण्याचे आवाहन प्रा कवाद यांनी केले आहे.शिवबा संघटनेचे अध्यक्ष अनिल शेटे यांनी उपस्थीतांचे आभार मानले.

0 Comments