जागतिक पर्यावरण दिनानिमित्त शिरापूर येथे वृक्षारोपण

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त शिरापूर येथे वृक्षारोपण


पारनेर प्रतिनिधी

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त पारनेर तालुक्यातील शिरापूर येथे जिल्हा परिषदेचे माजी सभापती मधुकर उचाळे यांच्या नेतृत्वाखाली व मार्गदर्शनखाली वेस्टर्न ट्रान्स को पॉवर लिमीटेड या कंपनीच्या माध्यमातून १०० झाडांचे वृक्षारोपण करण्यात आले.यासाठी कंपनीचे मॅनेजर संदीप शेरकर व इंजिनिअर प्रफुल्ल कुमार लाखे यांनी रोपे उपलब्ध करून दिले.कंपनीचे अधिकारी व कर्मचारी तसेच सरपंच गुंडाशेठ भोसले, उपसरपंच संतोष नरसाळे, भाऊसाहेब नरसाळे, राजेंद्र नरसाळे, कैलास नरसाळे, साईनाथ नरसाळे,मारुती नरसाळे, योगेश नरसाळे, सोमनाथ नरसाळे, तुकाराम नरसाळे, वसंत नरसाळे तसेच साईबाबा मंदिर नरसाळे वाडी साई सेवा मंडळ शिरापूर आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कंपनीचे मॅनेजर संदीप शेरकर यावेळी बोलताना म्हणाले जागतिक पर्यावरण दिन निसर्ग समतोल राखण्यासाठी खूप महत्वाचा आहे.यासाठी कंपनीच्या वतीने दरवर्षी मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण केले जाते.यावर्षी कंपनीने आदर्श गाव शिरापूर परिसराची निवड केली असून जिल्हा परिषदेचे माजी सभापती मधुकर उचाळे यांच्या नेतृत्वाखाली व मार्गदर्शनखाली वृक्षारोपण केले असून वृक्षसंवर्धन करण्याची जबाबदारी सरपंच हनुमंत भोसले व गावकऱ्यांनी घेतली आहे.


शिरापूर गावच्या सरपंचपदी गुंडाशेठ उर्फ हनुमंत भोसले व त्यांच्या सहकाऱ्यांची बिनविरोध निवड झाल्यानंतर गेली चार महिन्यांत मोठ्या प्रमाणात विकासकामे मार्गी लागली असल्याची प्रतिक्रिया  बोलताना जनतेतून व्यक्त होत आहे.तसेच सरपंच भोसले यांनी वाढदिवस साजरा न करता सामाजिक कार्याला मदत करण्यासाठी पुढाकार घेतला. आमदार निलेश लंके यांनी सुरू केलेल्या भाळवणी येथील शरदचंद्रजी पवार साहेब आरोग्य मंदीर कोव्हिड सेंटरला ११ हजार रूपयांची देणगी तसेच निघोज येथील संदीप पाटील वराळ जनसेवा फौंडेशन व निघोज ग्रामस्थ संचलित संदीप पाटील वराळ आरोग्य मंदीर कोव्हिड सेंटरला ५ हजार रूपयांची देणगी देउन सामाजिक उपक्रम राबवील्याबद्दल त्यांचे परिसरातून कौतुक होत आहे.

Post a Comment

0 Comments