पारनेर प्रतिनिधी
संदीप पाटील वराळ आरोग्य मंदीर कोव्हिड सेंटरच्या माध्यमातून निघोज व पंचक्रोशीतील शेकडो कुटुंबातील कोरोना रुण्गांना आरोग्य सेवा मिळाली असल्याचे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका उपाध्यक्ष मंगेश लाळगे यांनी व्यक्त केले आहे.२००५ या दहावीच्या माजी विद्यार्थ्यांनी संदीप पाटील वराळ आरोग्य मंदीर कोव्हिड सेंटरला ३१ हजार रूपयांची देणगी संदीप पाटील वराळ जनसेवा फौंडेशनचे तालुका अध्यक्ष सचिन पाटील वराळ यांच्याकडे सुपूर्द केली या वेळी लाळगे बोलत होते.यावेळी पठारवाडीचे ग्रामपंचायत सदस्य दौलतराव सुपेकर, एस टी आय ऑफीसर मुंबई योगेश सुपेकर, गजेंद्र वराळ, निघोज व्यापारी असोसिएशन पदाधिकारी रामेश्वर श्रीमंदिलकर, सुनिल श्रीमंदिलकर , अवि लंके प्रविण लंके हे माजी विद्यार्थी तसेच मुस्लिम समाजाचे नेते बशिरभाई मोमीन, अल्पसंख्याक समाजाचे मार्गदर्शक अस्लमभाई इनामदार आदी उपस्थित होते. लाळगे यावेळी म्हणाले गेली सव्वा महिन्यात कुरूंद कोहकडी पासून ते आळकुटी पंचक्रोशीतील शेकडो कुटुंबातील रुण्गांनी या कोव्हिड सेंटरमध्ये येऊन उपचार घेतले आहेत.संदीप पाटील वराळ जनसेवा फौंडेशनचे तालुका अध्यक्ष सचिन पाटील वराळ व त्यांच्या सहकाऱ्यांनी रात्रंदिवस काम करीत कोरोना रुण्गांची देवदूतासारखी सेवा केली आहे. अशाप्रकारे तालुक्याचे आमदार निलेश लंके यांनी भाळवणी येथील शरदचंद्रजी पवार साहेब आरोग्य मंदीर कोव्हिड सेंटरच्या माध्यमातून जिल्ह्यातील हजारो कुटुंबांतील रुण्गांना लाभ मिळवून दिला आहे.हे कोव्हिड सेंटर नसते तर तर सर्वसामान्य रुण्गांचे अतोनात हाल झाले असते आमदार निलेश लंके व सचिनभाऊ यांनी खऱ्या अर्थाने देवदूताची भुमिका घेऊन सेवा धर्म निभावला असल्याचे गौरवोद्गार लाळगे यांनी व्यक्त केले आहे. या वेळी संदीप पाटील वराळ जनसेवा फौंडेशनचे तालुका अध्यक्ष सचिन पाटील वराळ यांनी कोव्हिड सेंटरची माहिती दिली.तसेच लोकसहभागातून हे शक्य झाले असून या भागातील बहुतांश माजी विद्यार्थ्यांनी सहकार्य केले म्हणून आपल्याला व आपल्या सहकाऱ्यांना हा सेवाधर्म करता आला असल्याचे बोलताना सांगितले.
![]() |
| २००५ च्या दहावीच्या माजी विद्यार्थ्यांनी कोव्हिड सेंटरला ३१ हजार रूपयांची देणगी दिली आहे |

0 Comments