पारनेर प्रतिनिधी
शिरूरचे माजी आमदार पोपटराव गावडे,घोडगंगा सहकारी साखर कारखान्याचे संचालक राजेंद्र गावडे व गावडे साहेब समर्थक कार्यकर्त्यांचे वाढदिवस टाकळी हाजी येथील मळगंगा कोव्हिड सेंटरवर विवीध सामाजिक उपक्रम राबवीत साजरे करण्यात आले. माजी आमदार पोपटराव गावडे यांच्या प्रयत्नातून तसेच राज्याचे गृहमंत्री दिलीपराव वळसे पाटील यांच्या आशिर्वादाने हे कोव्हीड सेंटर गेली दहा दिवसांपूर्वी सुरू करण्यात आले असून पन्नास पेक्षा जास्त रुण्ग याठिकाणी उपचार घेत आहेत.घोडगंगा सहकारी साखर कारखान्याचे संचालक राजेंद्र गावडे, शिरूर तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष संजय बारहाते यांच्या नेतृत्वाखाली कोव्हिड सेंटरचे काम सुरू असून जिवणावश्यक वस्तू स्वरुपात मोठी मदत मिळाली आहे.दि.१,२,३ या तिनही दिवशी मोठ्या प्रमाणात मा.आ.गावडे , राजेंद्र गावडे व त्यांच्या समर्थक कार्यकर्त्यांचे वाढदिवस या कोव्हिड सेंटरला मोठ्या प्रमाणात साजरे करण्यात आले.यावेळी वृक्षारोपण, सॅनिटायझर मास्क वाटप, कोरोना रुण्गांना मिष्टान्न भोजन आदी सामाजिक उपक्रम राबवण्यात आले. यावेळी किर्तन प्रवचन आदिंचे आयोजन करण्यात आले होते.याबाबतची अधिक माहिती देताना घोडगंगा सहकारी साखर कारखान्याचे संचालक राजेंद्र गावडे यांनी सांगितले जगप्रसिद्ध कुंड रांजणखळगे परिसरातील मोठ्या जागेत चिंचेचे बन तयार करण्यासाठी ५०० चिंचांचे रोपे उपलब्ध करण्यात आली असून विवीध प्रकारचे आंबे,पिंपळ,वड तसेच असंख्य प्रकारची सावलीसाठी उपयुक्त ठरणारे रोपे उपलब्ध झाली असून वृक्षारोपण करण्यासाठी सातशे ते आठशे खड्डे तयार करण्याचे काम तीन दिवसांपासून सुरू करण्यात आले असून येत्या आठ ते पंधरा दिवसांत वृक्षारोपण पुर्ण करण्यात येणार आहे.या संकल्पनेची माहिती देताना शिरूर तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष संजय बारहाते यांनी सांगितले की गेली एक महिन्यापूर्वी राज्यातील जवळपास सर्वच हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजनची टंचाई मोठ्या प्रमाणात निर्माण झाली होती.त्यावेळी माजी आमदार पोपटराव गावडे, जिल्हा परिषद सदस्या सुनिताताई गावडे , घोडगंगा सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र गावडे व शिरुरच्या माजी नगराध्यक्षा मनिषाताई गावडे यांनी चर्चा करुण तसेच गाव व परिसरातील ज्येष्ठ कारभारी,युवक, पदाधिकारी यांच्याशी विचारविनिमय करीत जगप्रसिद्ध रांजणखळगे, राज्याचे गृहमंत्री दिलीपराव वळसे पाटील यांनी तीन कोटीचा निधी उपलब्ध करून दिलेले सांस्कृतिक कार्यालय तसेच मळगंगा मंदीर व विश्रामगृह परिसर यामध्ये बरीच मोठी जागा उपलब्ध आहे जेणेकरून या परिसरात आवश्यक अंतर ठेउन दिड हजार रोपांचे वृक्षारोपण करुन नैसर्गिक ऑक्सिजन व्यवस्था करता येईल.जेणेकरुन रुण्गांनी चार आठ दिवस औषध उपचार घेत या ठिकाणी फिरले तरी त्यांना नैसर्गिक निर्मित ऑक्सिजन उपलब्ध होईल.या करीता या आठ ते पंधरा दिवसांत सातशे ते आठशे रोपांचे वृक्षारोपण व पुढील वर्षी तेवढेच वृक्षारोपण करुन वृक्षसंवर्धन करीत नैसर्गिक निर्मित ऑक्सिजन वृक्षारोपण सामाजिक उपक्रम राबवण्याचा निर्णय घेण्यात आला असून त्याची सुरुवात नुकतीच वाढदिवसाच्या निमित्ताने करण्यात आल्याची माहिती बारहाते व टाकळी हाजी ग्रामस्थांनी बोलताना दिली आहे.
![]() |
| वृक्षारोपण, सॅनिटायझर मास्क, वाटप व कोरोना रुण्गांना मिष्टान्न भोजन देत कोव्हिड सेंटरला केला वाढदिवस साजरा. |

0 Comments