पारनेरमध्ये रुग्णांना मिळणार कॅशलेस उपचार
स्टार हेल्थ व मॅक्स बुपा हेल्थ इन्शुरन्स कंपनीची कॅशलेस सुविधा
ओंकार मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल पारनेर मध्ये मिळणार उपचार
चंद्रकांत कदम पारनेर
पारनेर तालुक्यासह परिसरातील रुग्णांना कॅशलेस पद्धतीने उपचार आता पारनेरमध्ये मिळणार आहेत. ओंकार मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल पारनेर येथे स्टार हेल्थ व मॅक्स बुपा या हेल्थ इन्शुरन्स कंपनीच्या इन्शुरन्स धारकांना येथे मोफत मिळणार आहेत.
सध्या जगभरात कोरोनासह इतर आजारांनी थैमान घातले आहे. सर्वसामान्य जनतेला खासगी दवाखान्यात उपचार घेणे परवडत नाही. काही रुग्ण पैसे नसल्याने उपचाराभवी स्वतःचा जीव गमावलेला आहे. समाजातील तळागाळातील जनतेला त्यांना परवडेल आशा दारात उपचार मिळावा यासाठी कॅशलेस पद्धतीने उपचार व्हावा म्हणून ओंकार मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल पारनेरचे संचालक डॉ श्रीकांत पठारे व डॉ पद्मजा पठारे हे नेहमी प्रयत्नशील होते. स्टार हेल्थ व मॅक्स बुपा या दोन इन्शुरन्स कंपनीचे इन्शुरन्स या हॉस्पिटलमध्ये केले जाणार असून ज्यांच्याकडे स्टार हेल्थ व मॅक्स बुपा कंपनीचे इन्शुरन्स असतील त्यांना कॅशलेस पद्धतीने मोफत उपचार पारनेर येथील ओंकार मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये मिळणार असल्याचे हॉस्पिटलचे संचालक डॉ श्रीकांत पठारे यांनी सांगितले.
अवघ्या कमी वार्षिक हप्ता असणाऱ्या या कंपन्यांच्या इन्शुरन्स मुळे आपण आपल्या संपूर्ण कुटुंबाचे उपचार त्यामाध्यमातून करू शकतो. त्यामुळे नागरिकांनी इतरत्र पैसे खर्च करण्यापेक्षा या मेडिक्लेम पॉलिसी मध्ये खर्च करून आपल्या कुटुंबाचा हेल्थ इन्शुरन्स केल्यास आपण आपल्या कुटुंबाच्या आरोग्याची काळजी घेऊ शकता. व त्यामुळे आपणास उपचारासाठी लागणाऱ्या अवाढव्य बिलाची काळजी करण्याची आवश्यक्यता नसल्याचे डॉ श्रीकांत पठारे यांनी सांगितले.
कोव्हीड सेंटर, बालरोग विभाग व कॅशलेस सुविधा जिल्ह्याभरात चर्चेचा विषय
डॉ श्रीकांत पठारे यांनी आतापर्यंत पूर्णवाद भवन येथे जवळपास दोन हजार कोरोनाग्रस्त रुग्णांवर मोफत उपचार केले आहेत. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत बालकांचे संरक्षण व्हावे यासाठी त्यांनी बालरोग कोव्हीड विभाग सुरू केला असून त्याचे काम देखील पूर्णत्वास आहे. आणि आता इतर आजारांवर कॅशलेस उपचार व्हावेत यासाठी त्यांनी सुरू केल्या कॅशलेस विभाग यामुळे तालुक्यासह परिसरातील गोरगरीब रुग्णांना उपचार मिळण्यास मदत होणार आहे. डॉ श्रीकांत पठारे यांच्या या सामाजिक कामाची पारनेर तालुक्यासह अहमदनगर जिल्ह्यात चर्चा होत आहे. खासगी दवाखाना असताना देखील कोव्हीड काळात नागरिकांना मोफत उपचार देणारे डॉ श्रीकांत पठारे राज्यातील एकमेव डॉक्टर असल्याचे बोलले जात आहे.




0 Comments