शिवबा संघटनेचा शिरूर तालुक्यात विस्ताराबाबत बैठक. शिवकार्य व सामाजिक कामामुळे तरुणाचा संघटनेकडे ओढा.


 शिवबा संघटनेचा शिरूर तालुक्यात विस्ताराबाबत बैठक.


शिवकार्य व सामाजिक कामामुळे तरुणाचा संघटनेकडे ओढा.

पारनेर प्रतिनिधी

शिरूर तालुक्यात नुकतीच विस्ताराबाबत संघटनेची बैठक अनिल शेटे यांच्या अध्यक्षेखाली टाकळी हाजी येथे नुकतीच पार पडली. शिरूर तालुक्यातील संघटनेचे प्रमुख सहकारी यावेळी उपस्थित होते. गेले १२ वर्षापासून संघटनेच्या माध्यमातून सामाजिक उपक्रम व सर्वसामान्य जनतेच्या न्याय हक्कासाठी संघर्ष सुरु आहे. त्याचप्रमाणे गेले २ वर्षापासून दुर्गसंवर्धनचे कामहि संघटनेच्या माध्यमातून सुरु आहे. एकिच्या बळामुळे अनेक कामे मार्गी लावण्यात यश आले असल्याचे संघटनेचे अध्यक्ष अनिल शेटे यांनी सांगितले.



    यावेळी अनेकानी मनोगत व्यक्त केले. ग्रामपंचायत सदस्य सोमनाथ भाकरे यानी प्रास्ताविक करून शिरूर तालुक्यातील संघटनेचे भक्कम काम उभे करण्याबाबत निर्धार व्यक्त केला. शेवटी युवा नेते केशव शिंदे यानी आभार मानले. व सर्व सहकार्यानी  संघटन वाढवून समाजकार्य करण्याचा निर्धार केला.


शिवबा संघटना शिरूर तालुका विस्ताराबाबत आयोजित टाकळी हाजी येथील बैठकीत प्रमुख शिलेदाराच्या उपस्थितीत सविस्तर चर्चा झाली. यावेळी शिवबा संघटना  अध्यक्ष अनिल शेटे, ग्रामपंचायत सदस्य सोमाशेठ भाकरे, युवा नेते केशव शिंदे,शिवबा विदयार्थी संघटना पारनेर तालुकाप्रमुख मच्छिंद्र लाळगे,अभिजीत भाकरे,कैलास भाकरे,आदिनाथ भाकते,राजु थोरात,सचिन कोतकर,अमोल रसाळ,ऋषीकेश शेटे,जनार्दन खेडकर,पारनेर तालुका सोशल मिडिया प्रमुख निलेश वरखडे, आदि कार्यकर्ते उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments