डॉ श्रीकांत पठारे कोरोनातून लवकर बरे व्हावे यासाठी मित्रपरिवार त्र्यंबकेश्वरात प्रार्थना तर काहींनी ठेवले देव पाण्यात

 

डॉ श्रीकांत पठारेंच्या उत्तम आरोग्यासाठी नागरिकाकांकडून देवाकडे आराधना



पारनेर प्रतिनिधी


कोरोना रुग्णांवर उपचार करताना डॉ श्रीकांत पठारे यांना कोरोनाची लागण झाली आहे. ते कोरोनातून लवकर बरे व्हावे व त्यांच्या उत्तम आरोग्यासाठी नाशिकस्थित मित्रपरिवाराने त्र्यंबकेश्वर (नाशिक) ज्योतिर्लिंग येथे आराधना सुरू केली असून पारनेर तालुक्यातील जनतेने देव पाण्यात ठेवले आहेत. आमच्या देवाला लवकरात लवकर बरे कर अशीच सद्भावना या सर्वांची असल्याचे दिसून येते.

 

      गेल्या २ दिवसांपूर्वी डॉ श्रीकांत पठारे यांना कोरोनाची लागण झाली. त्यानंतर त्यांना उपचारासाठी विलगिकरणात ठेवण्यात आले आहे. डॉ पठारे यांना कोरोनाची लागण झाली असल्याची बातमी समजताच पारनेर तालुक्यातील नागरिकांनी त्यांच्या उत्तम आरोग्यासाठी व कोरोनातून लवकरात लवकर बरे होण्यासाठी देवाकडे धावा केला. डॉ श्रीकांत पठारे यांच्या सामाजिक कामाबद्दल अनेकांनी सोशल मीडियावर भावना व्यक्त केल्या. डॉ श्रीकांत पठारे यांचे काही मित्रपरिवार नाशिक येथे कामानिमित्त स्थायिक आहेत. त्यांना डॉ पठारेंना कोरोनाची लागण झाल्याचे समजताच त्यांनी नाशिक येथील त्र्यंबकेश्वर येथे जात ज्योतिर्लिंगासमोर डॉ श्रीकांत पठारे यांच्या उत्तम आरोग्याबद्दल प्रार्थना केली.तर तालुक्यातील अनेक रुग्णांना यशस्वी उपचार करून घरी सोडलेल्या रुग्णांच्या नातेवाईकांनी व तालुक्यातील नागरिकांनी डॉ श्रीकांत पठारे लवकरात लवकर कोरोनातून बरे व्हावे यासाठी चक्क देवघरातील देवच पाण्यात ठेऊन प्रार्थना केली आहे. यातून डॉ श्रीकांत पठारे यांचे समाजातील नागरिकांवर व नागरिकांचे डॉ श्रीकांत पठारे यांच्यावरील प्रेम दिसून येत आहे.

Post a Comment

0 Comments