डॉ पठारेंच्या अनुपस्थितीती पत्नी डॉ पद्मजा पठारे रुग्णांची करतात अहोरात्र सेवा

 

रात्री २ वाजता कोव्हीड सेंटरमधील रुग्णांची भेट घेऊन केले उपचार



पारनेर प्रतिनिधी


पारनेर येथे ग्रामीण रुग्णालय डेडिकेटेड डॉ श्रीकांत पठारे संचलित कोव्हीड सेंटर पूर्णवाद भवन येथे सुरू करण्यात आले आहे. येथील रुग्णांवर उपचार करणारे डॉ श्रीकांत पठारे यांना कोरोनाची लागण झाल्याने ते विलगिकरणात उपचाराधीन आहेत. त्यामुळे कोव्हीड सेंटरमधील रुग्णांची ते स्वतः उपचारादरम्यान काळजी करत होते. इकडे निवांत झोप घेतील त्या डॉ पद्मजा पठारे कसल्या... त्यांनी रात्री २ वाजता कोव्हीड सेंटरमध्ये रुग्णांची भेट घेऊन उपचार केले व सविस्तर आढावा डॉ श्रीकांत पठारे यांना फोनवरून दिला. तेव्हा कुठे हे पठारे पती-पत्नी झोपले.


        डॉ श्रीकांत पठारे हे रुग्णसेवेबद्दल नेहमीच चर्चेत असतात. रुग्णांना मोफत उपचार देणे,  मोफत रुग्णवाहिका देणे, मोठा-मोठाल्या शस्त्रक्रिया अल्पदरात करने, तालुक्यातील रुग्णांना कोव्हीड सेन्टर उभारून मोफत उपचार करणे आदी गोष्टींमुळे डॉ श्रीकांत पठारे व त्यांच्या पत्नी नेहमीच चर्चेत आहेत. गेल्या २ दिवसांपूर्वी डॉ श्रीकांत पठारे यांना कोरोनाची लागण झाल्याने ते विलगिकरणात उपचार घेत आहेत. त्यामुळे कोव्हीड सेन्टरमधील रुग्णांच्या आरोग्याची कायम काळजी करत नेहमी फोन वरून डॉ श्रीकांत पठारे आढावा घेत आहेत. शनिवारी रात्री कोव्हीड रुग्णांच्या चिंतेने त्यांना काही केल्या झोप लागेना, शेवटी फो पद्मजा पठारे यांनी रात्री २ वाजता कोव्हीड सेंटरमधील रुग्णांना भेट देऊन त्यांच्यावर उपचार केले. व प्रत्येक रुग्णांची वैद्यकीय प्रगती डॉ श्रीकांत पठारे यांना फोनवरून दिल्यानंतर त्यांना कुठे अराम मिळाला व त्यानंतर पहाटे साडेतीन वाजता हे पती- पत्नी झोपी गेले.


स्वतः कोरोनाबधित असताना देखील रुग्णांची सेवा हीच ईश्वरसेवा मानणारे हे पठारे कुटुंबियांचे कौतुक तालुकभरातून होत आहे. डॉ श्रीकांत पठारे कोरोनातून लवकरात लवकर बरे व्हावे यासाठी तालुक्यातून नागरिक त्यांच्या आरोग्यासाठी प्रार्थना करत आहेत.


Post a Comment

0 Comments