पारनेर प्रतिनिधी
पारनेर तालुक्यात कोरेनाचा कहर सुरु आहे. या कालावधीत रुग्णाना बेड, ऑक्सिजन,व्हेंटीलेटर अशा अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. सामोरे जात असताना अनेक हॉस्पिटल व डॉ नी रुग्णाना लुटण्याचे प्रकार सुरु केला आहे. जणु काय त्यांना हि संधीच वाटत आहे. भरमसाठ बिले लावून लुटण्याचा प्रकार सुरु आहे. औषधचा तुटवडा दाखवून जास्त पैसे दिले कि तेथेच हॉस्पिटल मध्ये रेमडेशिवीर उपलब्ध होते. म्हणून अशा सबंधित डॉ वर आरोग्य विभागाने त्वरित कार्यवाही करणे गरजेचे आहे. अन्यथा शिवबा संघटनेच्या स्टाईलने सर्वांना धडा शिकवण्यात येईल असा इशारा शिवबा संघटनेच्या वतीने संस्थापक अध्यक्ष अनिल शेटे यांनी दिला आहे.
सबंधित डॉक्टरांची लॉबी आरोग्य विभाग याना सामील असल्याचे भासवून हि लुट करत आहे. म्हणून आरोग्य विभागाने त्वरित याबाबत कार्यवाही करावी. आरोग्य विभागाला बदनाम करण्याचे काम सबंधित लॉबीकडुन होत आहे. तरीही जर कार्यवाही झाली नाहि तर पुराव्यानिशी शिवबा संघटना व तालुक्यातील समविचारी संघटनाचे शिष्टमंडळ आरोग्य अधिकारी याना याबाबत जाब विचारेल असे शिवबा संघटनेचे अध्यक्ष अनिल शेटे यानी सांगितले. व त्याचप्रमाणे लुट होत असणाऱ्या रुग्णानी आपली हॉस्पिटल बिले जपून ठेवावी. स्थानिक लेवल ला कार्यवाही न झाल्यास सबंधित बिले घेउन आपण जिल्हाअधिकारी यांची भेट घेणार असल्याचे सांगितले.
या प्रकारासबंधी निवेदन मा. राजेश टोपे आरोग्यमंत्री महाराष्ट्र, मा. सुजयदादा विखे पाटील खासदार अहमदनगर,मा. निलेशजी लंके साहेब आमदार पारनेर,जिल्हाअधिकारी अहमदनगर,मा. ज्योती देवरे मॅडम तहसीलदार, मा. लाळगे पी. एस साहेब आरोग्य अधिकारी पारनेर याना मेलद्वारे पाठविण्यात आहे आहे.

0 Comments