सरपंच कारखीले यांच्या माता-पित्याच्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्त कोव्हीड सेंटरला मदत

 

निघोज येथील संदीप पाटील वराळ कोव्हीड सेंटरला ५ हजार रु मदत

पारनेर प्रतिनिधी



राळेगण थेरपाळ गावचे प्रथम लोकनियुक्त सरपंच पंकजदादा कारखिले यांचे वडील श्री अशोक केरू कारखिले व मातोश्री सौ. विश्वमाला अशोक कारखिले यांच्या २८ व्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्त संदीप पाटील वराळ कोव्हीड सेंटरला ५ हजार रुपये आर्थिक देणगी देण्यात आली. कारखीले परिवाराच्या या सामाजिक दातृत्वाबद्दल त्यांचे परिसरातून कौतुक होत आहे.

 अशोक कारखिले हे निंमगाव म्हाळुंगी येथे विद्या विकास मंदिर या ठिकाणी प्राध्यापक आहेत. तर सौ विश्वमाला कारखिले या रांजणगाव गणपती जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येथे शिक्षिका आहेत. सामाजिक बांधिलकी म्हणून लग्नाच्या वाढदिवसाचा खर्च टाळून जगप्रसिद्ध रांजणखळगे परिसरात निघोज ग्रामस्थांच्या वतीने व सरपंच चित्राताई वराळ यांच्या माध्यमातून सुरू करण्यात आलेल्या संदीप पाटील वराळ कोविड केअर सेंटर साठी ५००० रूपयांची देणगी दिली

Post a Comment

0 Comments