सामाजिक अंतर ठेऊन वडनेरमध्ये लसीकरण पार पडले
गावात लस मिळाल्याने नागरिकांतून समाधान
पारनेर प्रतिनिधी
वडनेर बु. उपकेंद्रातील लसीकरणाचे नियोजन आदर्शवत असून ग्रामपंचायत आणि स्वयंसेवकांचा सहभाग कौतुकास प्राप्त आहे. असे मत आरोग्य अधिकारी डॉ. डोणे यांनी व्यक्त केले. वडनेर बु उपकेंद्रात १०० नागरिकांचे कोरोना लसीकरण करण्यात आले. ४५ वर्षे वयापुढील पहिला डोस घेतलेल्या नागरिकांना दुसऱ्या डोससाठी प्राधान्य देण्यात आले होते. तद्नंतर इतर नागरीकांना पहिला डोस दिला गेला. यावेळी नागरिकांना मार्गदर्शन करताना त्या बोलत होत्या.
![]() |
| वडणेर बु. येथे लसीकरणाचा शुभारंभ करताना डॉ. डोने व समवेत ग्रामपंचायत पदाधिकारी व ग्रामस्थ |
कोरोनाचे रुग्ण वाढल्याने नागरिकांमध्ये भीती पसरली होती. त्यातच लसीकरणासाठी नंबर लागत नसल्याने नागरिक हवालदिल झाले होते. अशातच वडनेर उपकेंद्रात लवकर लसीकरण व्हावे यासाठी नागरिकांची मागणी वाढत होती. आणि त्यासाठी ग्रामपंचायतच्या वतीने प्रयत्न चालू होते. अखेर आज दिनांक १० मे रोजी लसीकरण कॅम्पचे आयोजन केले होते. या लसीकरणाच्या पार्श्वभूमीवर गेले तीन दिवस सरपंच श्री. राहुल सुकाळे यांच्या नेतृत्वाखाली ग्रामपंचायतच्या माध्यमातुन तयारी केली गेली होती. लसीकरणासाठी उपयुक्त सूचना नागरिकांना दिल्या गेल्या होत्या.
![]() |
| सामाजिक अंतर ठेवून लसीकरण करून घेताना वडणेर बु येथील ग्रामस्थ.... |
लसीकरण करण्यासाठी नागरिकांनी सकाळी सहा वाजल्यापासून रांग लावली होती. शारीरिक अंतर ठेवून, मुखपट्टी परिधान करून नागरिकांनी अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने लसीकरण करून घेतले. यावेळी लसीकरणासाठी आलेल्या नागरिकांना ग्रामसमृद्धी फाऊंडेशनच्या वतीने मास्क पुरवले गेले.
तालुका आरोग्य अधिकारी डॉ. प्रकाश लाळगे यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य खात्याचे वसंत श्रीमंदीलकर, डॉ. प्रविण नरसाळे, रईसा शेख, विशाल चौधरी, मीरा रसाळ, विद्या भालेकर, अलका वाजे, संगिता भालेकर यांनी लसीकरणाचे काम पाहिले.
लसीकरण यशस्वी होण्यासाठी सरपंच राहुल सुकाळे, उपसरपंच पूनम खुपटे, ग्रा. सदस्य रमेश वाजे, आशाताई चौधरी, रेखाताई येवले, स्वातीताई नऱ्हे, पांडुरंग येवले, अनिल नऱ्हे, विकास वाजे, सोपान येवले, शिवाजी पवार, उत्तम बाबर, गणेश शेटे, राहुल बाबर, शेखर थोरात आदींनी परीश्रम घेतले.
यावेळी पोलीस खात्याचे श्री निकम आणि त्यांचे सहकारीही बंदोबस्तासाठी उपस्थित होते. अतिशय नियोजनपूर्वक पार पडलेल्या उपक्रमाबद्दल नागरिकांनी समाधान व्यक्त केले आणि लवकरात लवकर असाच पुढचा कॅम्प घेण्याची मागणी केली.


0 Comments