पिंपरी जलसेनचे पाणी फाऊंडेशनचे काम राज्यात आदर्शवत - रोहयो उपआयुक्त डॉ चिखले

 पिंपरी जलसेनचे पाणी फाऊंडेशनचे काम राज्यात आदर्शवत - रोहयो उपआयुक्त डॉ चिखले

पारनेर प्रतिनिधी

पाणी फाऊंडेशन स्पर्धेत राज्यात द्वितीय क्रमांक मिळविलेल्या पिंपरी जलसेनचे पाणलोटाचे काम राज्यात आदर्शवत आहे. रोजगार हमी योजने अंतर्गत नाडेप व शोषखड्यांचे कामे देखील चांगल्या प्रकारे झाली असल्याचे गौरवोद्गार नाशिकचे रोहयो विभागाचे  उपायुक्त डॉ चिखले यांनी काढले.

पिंपरी जलसेन येथे रोहयो अंतर्गत नाडेप व शोष खड्ड्यांची पाहणी करताना उपायुक्त डॉ चिखले.

       पारनेर तालुक्यातील पिंपरी जलसेन येथील रोहयो अंतर्गत सुरू असलेल्या नाडेप व शोष खड्यांच्या कामाची पाहणी रोहयो उपआयुक्त डॉ चिखले यांनी केली. यावेळी तहसीलदार ज्योती देवरे, गटविकास अधिकारी किशोर माने, तालुका आरोग्य अधिकारी डॉ प्रकाश लाळगे आदिंनी पिंपरी जलसेन येथे भेट दिली. पाणी फौंडेशनच्या राज्यस्तरीय स्पर्धेत राज्यात द्वितीय क्रमांक मिळविल्यानंतर समृद्ध गाव स्पर्धेत पिंपरी जलसेन गावाने भाग घेतला आहे. अहमदनगर जिल्ह्यातून फक्त १० गावांची "समृद्ध गाव" या योजनेसाठी निवड झाली आहे. त्यापैकी पिंपरी जलसेन या एकमेव गावाच्या रोहयो कामांची पाहणी करण्यासाठी नाशिकचे रोजगार हमी योजनेचे उपायुक्त डॉ.चिखले हे आले होते.

        पिंपरी जलसेन येथील रोहयोच्या कामांची पाहणी केल्यानंतर ते बोलताना म्हणाले की, पिंपरी जलसेनच्या ग्रामस्थांनी पाणलोटाचे खूप चांगले काम केले आहे. पानलोटांच्या कामात राज्यात द्वितीय क्रमांक आला असून राज्याला ते आदर्शवत आहेत. सध्या "समृद्ध गाव" या योजनेत जिल्ह्यातील१० गावांनी सहभाग घेतला असून त्यात पिंपरी जलसेन हे एक आहे. गावाला डोंगर व पाणी अडवण्यासाठी चांगली वनसंपत्ती लाभलेली आहे. गावकरी याचा पुरेपूर वापर पाणलोटासाठी करत आहेत. सध्या नाडेप व शोष खड्यांची कामे चांगली केलेली आहेत. उर्वरित कामे पूर्ण झाल्यानंतर गावकऱ्यांना अनेक वैयक्तिक लाभ मिळणार आहेत. असे डॉ चिखले म्हणाले.

मियावाकी प्रकल्पाची पाहणी करतां उपायुक्त डॉ. चिखले व टीम

      पिंपरी जलसेन येथे सुरू असलेल्या  मियावाकि जंगल प्रकल्पाला देखील या संपूर्ण टीम ने भेट दिली. यावेळी मियावाकी जंगल प्रकल्प हे १८ महिन्यांत जंगल उभे राहणार असलेल्या प्रकल्पाची माहिती डॉ चिखले यांनी घेतली. हा प्रकल्प देखील पर्यावरणासाठी खूप चांगला असून प्रत्येक गावागावात असे प्रकल्प उभे करणे गरजेचे असल्याचे डॉ. चिखले म्हणाले. यावेळी पिंपरी जलसेनचे सरपंच सुरेश काळे, ग्रामविकास अधिकारी सुनील दुधाडे, ग्रामरोजगार सेवक माऊली थोरात, ग्रामपंचायत कर्मचारी दिनेश शेळके उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments