शिवबा संघटना पदाधिकाऱ्यांच्या निवडी जाहीर.
पारनेर प्रतिनिधी
गेले १४ वर्षापासून सामाजिक कामात अग्रेसर पणे शिवबा संघटनेने पारनेर तालुक्यात काम केले आहे. संघटनेचे उत्तम संघटन तालुक्यात आहे. त्याजोरावर अनेक सामाजिक आंदोलने यशस्वी केली. म्हणूनच संघटना तालुक्यात लोकप्रिय बनत आहे. संघटनेचे क अधिक बळकट करण्यासाठी व समाजातील उपेक्षित लोकांची सेवा घडावी म्हणून शिवबा संघटना पदाधिकाऱ्यांच्या तालुकास्तरावर निवडी जाहीर करण्यात आल्या आहेत. यापुढील काळात संघटनेत चांगल्या व समाजाची तळमळ असणाऱ्या तरुणांना विविध पदावर काम करण्याची संधी देण्यात येणार असल्याचे अध्यक्ष अनिल शेटे यांनी सांगितले.
नुकत्याच काहि पदाधिकाऱ्यांच्या निवडी संघटनेचे अध्यक्ष अनिल शेटे यानी केल्या. त्यामध्ये अल्पसंख्याक तालुकाप्रमुख म्हणून हिवरे कोरडा येथील मा. नवशाद पठाण, विद्यार्थी तालुकाप्रमुख निघोज येथील मा. मच्छिंद्र लाळगे,शेतकरी तालुकाप्रमुख देविभोयरे येथील मा.जयराम सरडे व पारनेर शहर प्रमुख म्हणून मा. निलेश दरेकर यांची नियुक्ती करण्यात आली. नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांना संघटनेचे अध्यक्ष अनिल शेटे, मार्गदर्शक राजुभाउ लाळगे,रमेश भाऊ वरखडे, उमेश भाऊ सोनवणे, विठ्ठल कवाद, शैलेश ढवळे,संदीप कवाद,नवनाथ लामखडे,खंडु लामखडे,स्वप्नील लामखडे,राहुल शेटे,अंकुश वरखडे,विश्वास शेटे,शंकर वरखडे आदिनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

0 Comments