गुरेवाडी, कर्जुले हर्या, पोखरी येथील बजरंग दलाच्या युवकांनी घेतली डॉ श्रीकांत पठारे यांची भेट

 गुरेवाडी, कर्जुले हर्या, पोखरी येथील बजरंग दलाच्या युवकांनी घेतली डॉ श्रीकांत पठारे यांची भेट

डॉक्टरांच्या सामाजिक कामाचे केले कौतुक



पारनेर प्रतिनिधी


कोरोना रुग्णांवर निदान करता करता स्वतः कोरोनाबाधीत होऊन देखील पुन्हा कोरोना रुग्णांच्या सेवेत दाखल झालेले कोरोना योद्धा शिवसेनेचे पारनेर पंचायत समिती सदस्य डॉ श्रीकांत पठारे यांची गुरेवाडी, कर्जुले हर्या, पोखरी येथील बजरंग दलाच्या युवकांनी भेट घेतली. डॉ श्रीकांत पठारे करत असलेल्या सामाजिक कामाचे कौतुक देखील केले.

            पारनेर ग्रामीण रुग्णालय डेडिकेटेड पूर्णवाद भवन येथे डॉ श्रीकांत पठारे संचलित कोव्हीड सेंटर सुरू आहे. येथे आतापर्यंत जवळपास दीड हजार रुग्णांवर उपचार झाले आहेत. डॉ पठारे यांनी सुरू केलेल्या कोव्हीड सेंटरला राज्यभरातून मदत होत आहे. डॉ श्रीकांत पठारे यांच्या सामाजिक कामावर प्रेरित होऊन समाजातून अनेक दानशूर मदत करत आहेत. कोव्हीड सेंटरमध्ये रुग्णांवर उपचार करत असताना डॉ श्रीकांत पठारे यांना कोरोनाची लागण झाली होती. कोरोनावर मात करून डॉ श्रीकांत पठारे हे पुन्हा रुग्णांच्या सेवेत दाखल झाले आहेत. डॉक्टर पठारे करत असलेल्या सामाजिक कामाबद्दल गुरेवाडी, कर्जुले हर्या, पोखरी येथिल बजरंग दलाच्या युवकांनी डॉ श्रीकांत पठारे यांची भेट घेऊन सुरू असलेल्या सामाजिक कामाचे कौतुक केले. आपण करत असलेल्या सामाजिक कामावर आम्ही प्रेरित झालो आहे. समाजामध्ये निस्वार्थी पणे सेवा करणाऱ्यांची संख्या कमी असल्याचे युवकांनी मत व्यक्त केले.

Post a Comment

0 Comments