स्वतःला फकीर म्हणणाऱ्या आ. लंकेंना अब्रुनुकसानीचे एक कोटी हवेत कशाला - मनसे जिल्हाध्यक्ष सचिन डफळ यांचा सवाल

 

औद्योगिक वसाहतीतील प्रकरणे बाहेर काढल्यास पळता भुई थोडी होईल - डफळ

अब्रुनुकसानीच्या नावाखाली खंडणी मागण्याचा प्रकार - बाळासाहेब माळी

बनावट ऑडिओ क्लिप द्वारे आ. लंके यांची बदनामी केल्याचा आरोप करत १ कोटी रुपयांचा अब्रुनुकसानीचा दाव्याची मनसे उपतालुकाप्रमुख अविनाश पवार यांना नोटीस

मनसेची पारनेरमध्ये पत्रकार परिषदेतून आ. लकें यांच्यावर हल्लाबोल



पारनेर प्रतिनिधी


मनसेच्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला शिवीगाळ करून त्याच्यावरच अब्रुनुकसानीचा दावा करणाऱ्या व स्वतःला फकीर समजणाऱ्यांना दाव्यापोटी एक कोटी रुपये हवेत कशाला ? असा सवाल महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिहाध्यक्ष सचिन डफळ यांनी पारनेरचे आमदार निलेश लंके यांना केला आहे.


पारनेर तालुका मनसे उपतालुकाप्रमुख अविनाश पवार यांनी आ. निलेश लंके यांच्या आवाजाची बनावट ऑडिओ क्लिप बनवून सोशल मीडियावर सर्वत्र व्हायरल करून आ. लंके यांची राजकीय दृष्ट्या बदनामी करून देशपातळीवर प्रतिमा मलिन केल्याचा आरोप करत मनसे उपतालुकाप्रमुख अविनाश पवार यांच्यावर १ कोटी रुपये अब्रुनुकसानीच्या दाव्याची नोटीस आ. लंके यांनी वकिलाकरवी अविनाश पवार यांना पाठवली होती. त्याबाबत आज मनसे जिल्हाध्यक्ष सचिन डफळ यांनी पारनेर येथे पत्रकार परिषद घेऊन आ. निलेश लंके यांच्यावर हल्लाबोल केला.

११ मे रोजी मनसे उपतालुकाप्रमुख अविनाश पवार यांनी कोरोना सदृष्य रुग्णाला उपचारासाठी रुग्णवाहिकेसाठी भाळवणी विभागातील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या प्रमुख डॉ मानसी मानोरकर यांना फोन केला होता. या फोनचा राग आल्याने डॉ सुनील गंधे यांनी अविनाश पवार यांना फोन करून विचारणा केली व सोबत असलेल्या आ. लंके यांच्याकडे फोन दिला. यावेळी आ.लंके यांनी अविनाश पवार बोलत असताना मी मनसे पदाधिकारी असल्याचे पवार यांनी सांगताच आ.लंके यांनी अर्वाच्य भाषेत पवार यांना शिवीगाळ केली. या फोनची रेकॉर्डिंग अविनाश पवार यांनी सोशल मीडियावर व्हायरल केली होती. त्या अनुषंगाने त्या ऑडिओ क्लिप मधील आवाज हा आ.निलेश लंके यांचा नसून आ. लंके यांची भाजपच्या एक पदाधिकाऱ्याच्या सांगण्यावरून राजकीयदृष्ट्या बदनामी करण्यासाठी ही क्लिप व्हायरल केली आहे. आ. लंके हे कोव्हीड सेंटरच्या माध्यमातून राज्यभरातील जनतेची सेवा करत असून देशभरात त्यांच्या कार्याची दखल घेतली आहे. परंतु बनावट ऑडिओ क्लिप द्वारे आ. लंके यांची बदनामी केल्याने त्यांची नाहक देशभरातील प्रतिमा मालिन झाली असून त्यापोटी मनसे उपतालुकाप्रमुख अविनाश पवार यांनी लेखिमाफी मागून अब्रुनुकसानीपोटी १ कोटी रुपये द्यावेत अशी नोटीस आ. लंके यांनी अविनाश पवार यांना पाठविली आहे. त्याअनुषंगाने मनसेचे अधिकृत मत मांडण्यासाठी आज सकाळी पारनेर येथे मनसे जिल्हाध्यक्ष सचिन डफळ यांनी पत्रकार परिषद घेतली. मनसे जिल्हाउपाध्यक्ष बाळासाहेब माळी, तालुका उपाध्यक्ष अविनाश पवार उपस्थित होते.


    पत्रकार परिषदेत बोलताना जिल्हाध्यक्ष सचिन डफळ म्हणाले की, कोरोना रुग्णाला उपचारासाठी रुग्णवाहिका ही प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉ मानसी मानोरकर यांच्याकडे मागितली होती. परंतु करण नसताना याबाबत सुनील गंधे यांनी अविनाश पवार यांना फोन केला व आ. लंके यांच्याकडे बोलायला दिले. अविनाश पवार हे मनसेचे पदाधिकारी आहे असे सांगितल्याने आ. लंकेचा पारा चढला व त्यांनी अविनाश पवार यांना करण नसताना शिवीगाळ केली. आणि वरून अविनाश पवार यांच्यावरच अब्रुनुकसानीचा १ कोटींचा दावा दाखल केला आहे. ही हुकूमशाही मनसे खपवून घेणार नाही. एकीकडे आ. लंके हे स्वतःला फकीर म्हणवून घेतात तर मग त्यांना अब्रुनुकसानीपोटी १ कोटी रुपये हवेत कशाला ? असा सवाल सचिन डफळ यांनी केला आहे. पारनेर तालुक्यातील प्रशासकीय अधिकारी तहसीलदार, पोलीस निरीक्षक हे दबावाखाली काम करत आहे. प्रशासकीय अधिकाऱ्यांना वेतन हे सर्वसामान्यांच्या करातून मिळत असून ते जनतेचे सेवक आहेत. प्राशसकीय अधिकाऱ्यांनी त्यांच्या पदाचा अवमान करू नये व कोणाच्या दबावाखाली कामे न करता जनतेसाठी कामे करावेत असा इशारा सचिन डफळ यांनी दिला. भाळवणी औद्योगिक वसाहतीत काय प्रकार सुरू आहे हे जनतेसमोर आणल्यास पळता भुई थोडी होईल असा इशारा आ. लंके यांचे नाव न घेता जिल्हाध्यक्ष सचिन डफळ यांनी दिला आहे.  मनसे जिल्हाउपाध्यक्ष बाळासाहेब माळी बोलताना म्हणाले की, जिल्हा परिषद निवडणुकीत आपल्या पत्नीला, विधानसभा निवडणुकीत तुम्हाला मतदान करणाऱ्या कार्यकत्याला आपण शिवीगाळ करता, तुम्हीच शिवीगाळ करून सर्वसामान्य कार्यकत्यावर १ कोटींचा अब्रुनुकसानीचा दावा दाखल करता हा कुठल्या न्याय आहे ? आपल्या सोबत असणाऱ्या गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व गुंडप्रवृत्तीच्या लोकांना सोबत घेऊन घेऊन आपण एकप्रकारे खंडणी मागत असल्याचा आरोप आ . निलेश लंके यांच्यावर जिल्हाउपध्यक्ष बाळासाहेब माळी यांनी केला आहे.


Post a Comment

0 Comments