आजी माजी सैनिक सेवाभावी संस्था निघोज यांनी दिली संदीप पाटील वराळ आरोग्य मंदीर कोव्हिड सेंटरला ४८ हजार ८२१ रूपयांची देणगी.
पारनेर प्रतिनिधी
सैनिक म्हटले की देशसेवा मात्र देशसेवा करताना आजी माजी सैनिकांनी व सैन्यदलात कार्यरत असणाऱ्या आजी माजी अधिकाऱ्यांनी समाजसेवेला सर्वाधिक प्राधान्य दिले असल्याचे अनेक उदाहरणे आपण प्रत्यक्ष पाहीली आहेत निघोज व परिसरातील आजी माजी सैनिकांनी एकत्र येऊन सेवाभावी संस्था स्थापन केली आहे कारगील विजय दिन असो किंवा ईतर राष्ट्रीय कार्यक्रमाला प्रोत्साहन देणारे कार्यक्रम संपन्न करीत ही संस्था परिसराला देशप्रेमी संदेश देण्याचे काम करीत असतात आपला गाव व परिसरातील सामाजिक संस्थांना सातत्याने पाठबळ देण्याचे काम ही संस्था सातत्याने करीत असते गाव व परिसरातील जनतेला अभिमान वाटतो अशाप्रकारे या संस्थेचे काम गौरवास्पद आहे या आजी माजी सैनिक सेवाभावी संस्थेने संदीप पाटील वराळ जनसेवा फौंडेशन व निघोज ग्रामस्थ संचलित संदीप पाटील वराळ आरोग्य मंदीर कोव्हिड सेंटरला ४२ हजार ८२१ रूपयांची देणगी दिली आहे संदीप पाटील वराळ जनसेवा फौंडेशनचे तालुका अध्यक्ष सचिन पाटील वराळ व त्यांच्या सहकाऱ्यांना तसेच ग्रामस्थांना या संस्थेने आशिर्वादरूपी मदत केली आहे सातत्याने निघोज व पंचक्रोशीतील विकासाभिमुख पाठबळ देणारी ही आजी माजी सैनिकांची सेवाभावी संस्था गावविकासाला मिळालेले वरदान असल्याने अभिमानाने सांगण्यास आम्हाला आनंद वाटत आहे या संस्थेच्या आजी माजी सैनिकांनी ४२ हजार ८२१ रूपयांची देणगी संदीप पाटील वराळ जनसेवा फौंडेशनचे तालुका अध्यक्ष सचिन पाटील वराळ यांच्याकडे सुपूर्द केली यावेळी कॅप्टन विठ्ठलराव वराळ ,वॉरंट ऑफिसर पोपटराव लंके सेवानिवृत्त पोलिस निरीक्षक सहादू वराळ साहेब, मेजर रघुनाथ लंके ,मेजर विकासजी वराळ, मेजर गोपाळराव वराळ ,मेजर विजय वराळ ,मेजर दगडूजी डेरे ,मेजर महादेव पाटील ,मेजर अमोल ठुबे ,मेजर संभाजी ढोणे, मेजर माऊली शेटे ,मेजर माऊली रसाळ, मेजर मंजाभाउ गुंड आदी तसेच आजी माजी सैनिक सेवाभावी संस्थेचे अधिकारी पदाधिकारी व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते ४२ हजार ८२१ रुपयांची देणगी दिल्याबद्दल संदीप पाटील वराळ जनसेवा फौंडेशन व निघोज ग्रामस्थांनी संबंधीतांचे धन्यवाद व्यक्त करीत आभार मानले आहेत.

0 Comments