१९९८ बॅचच्या दहावीच्या माजी विद्यार्थ्यांनी संदीप पाटील वराळ आरोग्य मंदीर कोव्हिड सेंटरला दिली ४५ हजार ८४४ रुपयांची देणगी

 


१९९८ बॅचच्या दहावीच्या माजी विद्यार्थ्यांनी संदीप पाटील वराळ आरोग्य मंदीर कोव्हिड सेंटरला दिली ४५ हजार ८४४ रुपयांची देणगी

पारनेर प्रतिनिधी 

    गेली तीन आठवड्यापासून सुरू असलेल्या संदीप पाटील वराळ आरोग्य मंदीर कोव्हिड सेंटरला देणग्यांचा ओघ सुरू आहे यामध्ये दहावीच्या माजी विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणात योगदान दिले असून आज रविवार दि ३० रोजी १९९८ बॅचच्या १० वी मधील माजी विद्यार्थ्यांनी ४५ हजार ८४४ रूपयांची देणगी दिली आहे आपण ज्या गावात शिक्षण घेतले खेळलो बागडलो लहानाचे मोठे झालो अशा आपल्या गाव व परिसरातील जनता आज कोरोना संकटाने विचलित झाली आहे जनजीवन विस्कळित झाले आहे एकमेकांची मने सैरभैर झाले आहेत अशा आपल्या समाजबांधवांना मायेचा आधार देण्याची खरी गरज आहे संदीप पाटील वराळ जनसेवा फौंडेशन व निघोज ग्रामस्थ संचलित संदीप पाटील वराळ आरोग्य मंदीर कोव्हिड सेंटर सुरू करुन सचिनभाऊ व त्यांचे सहकारी तसेच ग्रामस्थांनी लोकांना आधार देण्याचे काम केले आहे फुलना फुलाची पाकळी म्हणून आपण या कोव्हिड सेंटरला मदत केल्यास ईतरांनाही सेवाभावी काम करण्याची प्रेरणा मिळेल उत्तेजन मिळेल आणी कोरोना संकटाचा मुकाबला करण्यासाठी आपले गावकरी सक्षम होतील हा उदात्त विचार घेऊन १९९८ या बॅचच्या माजी विद्यार्थ्यांनी ४५ हजार ८४४ रूपयांची देणगी  संदीप पाटील वराळ जनसेवा फौंडेशनचे तालुका अध्यक्ष सचिन पाटील वराळ यांच्याकडे सुपूर्द केली आहे यामध्ये मुंबई पुणे व विविध जिल्ह्यांत कार्यरत असणारे अधिकारी आहेत व्यवसायीक आहेत आणी हाच खरा ग्रामस्थांचा अभिमान आहे आमच्या गावची मुले शिक्षण घेउन मोठी झाली संकटकाळी मात्र आम्हाला ते विसरली नाहीत आणी विसरणार सुद्धा नाही यावेळी सुशिल पिंपरकर जगदीश वराळ आदिनाथ दरेकर अरुण चौधरी  अहमदनगर जिल्हा परिषद वरिष्ठ अधिकारी संतोषजी लंके विजय निचीत संदीप शिंदे पोपट ढवळे शहाजी पवार संतोष अटक संभाजी रसाळ मोहन सुपेकर पोपट लंके  समीर हावलदार सर  श्रीकांत पवार आदी उपस्थित होते अशा या १९९८ दहावीच्या माजी विद्यार्थ्यांनी ४५ हजार ८४४ रुपयांची देणगी दिल्याबद्दल संदीप पाटील वराळ जनसेवा फौंडेशन व निघोज ग्रामस्थ यांनी  धन्यवाद व्यक्त करीत आभार मानले आहेत.

Post a Comment

0 Comments