डॉ श्रीकांत पठारेंच्या माध्यमातून पठार भागातील जनतेला अमोल ठुबे देतात वैद्यकीय सेवा

 

डॉ. श्रीकांत पठारेंच्या खांद्याला खांदा लावून कोव्हीड सेंटरमध्ये करतात "ते" दिवसरात्र रुग्णांची सेवा...



पारनेर प्रतिनिधी

पारनेर येथे पूर्णवाद भवन मध्ये सुरू केलेल्या कोव्हीड सेंटरमध्ये डॉ श्रीकांत पठारे व त्यांच्या पत्नी डॉ पद्मजा पठारे हे २४ तास रुग्णांच्या सेवेत आहेत. त्यांच्याच सोबतीला पठार भागातील कान्हूर पठार येथील युवक अमोल पठारे हे रुग्णांची सेवा करत आहेत. अमोल ठुबे देखील डॉ पठारेंचे सहकारी स्वयंसेवक म्हणून कोव्हीड सेंटरमध्ये रुग्णसेवा करत आहेत. पठार भागातील अनेक रुग्णांची त्यांनी कोव्हीड सेंटरच्या माध्यमातून सेवा केली आहे.


     अमोल ठुबे हे कान्हूर पठार गावचे रहिवाशी असून घरात वडिलांकडून कॉम्रेड विचारांचा वारसा आहेत. सर्वसामान्य कुटुंबात राहणारे अमोल ठुबे हे डॉ श्रीकांत पठारे यांच्या माध्यमातून पंचायत समिती, जिल्हा परिषद व इतर योजना पठार भागातील जनतेपर्यंत पोहचवून सर्वसामान्य जनतेला या योजनांचा लाभ देण्याचे काम ठुबे करत आहेत. आता कोरोनाचा हाहाकार सर्वत्र माजला असून ग्रामीण भागात कोरोना रुग्णसंख्या वाढत आहे.अशावेळी रुग्णांना बेड, ऑक्सिजन उपलब्ध होत नाहीत. या परिस्थितीत पठार भागातील कान्हूर पठार, विरोली, अक्कलवाडी, नवलेवाडी व परिसरातील कोव्हीड रुग्णांना डॉ श्रीकांत पठारे यांच्या माध्यमातून कोव्हीड सेंटरमध्ये बेड उपलब्ध करून देऊन दिवसरात्र ते रुग्णांची सेवा करत आहेत. 

      कोरोनाच्या काळात सर्वजण आपल्या व आपल्या परिवाराची काळजी घेत स्वतःच्या घरातच थांबून आहे. अशा परिस्थितीत अमोल ठुबे हे आपल्या कुटुंबाची व स्वतःची काळजी घेण्यापेक्षा रुग्णसेवा करण्यासाठी धडपडत आहेत. डॉ श्रीकांत पठारें यांच्या कार्यावर व विचारांवर प्रेरित होऊन अमोल ठुबे हे  समाजसेवेत आहेत. त्यांनी मागील वर्षी कोरोना काळात नागरिकांना जीवणावश्यक किराणा, परराज्यातील लोकांना जेवण आदींसह कोरोना काळात जनतेला मदत करून धीर देण्याचे काम ते करत आहेत.



अमोल एक मेहनती सहकारी - डॉ पठारे

अमोल ठुबे हा युवक गेल्या अनेक वर्षांपासून समाजसेवेते आहे. समाजातील अनेक लोकांची तर्क निस्वार्थीपणे समाजसेवा करत आहे. कोरोनाच्या काळात त्यांनी कोव्हीड सेंटरसाठी मोलाचे योगदान दिले आहे. त्याचे नेहमी सहकार्य असून त्याची मेहनत व काम करण्याची सचोटी हीच त्यांची ओळख  आहे. असे मत डॉ श्रीकांत पठारे यांनी व्यक्त केले.

Post a Comment

0 Comments