सामाजिक दृष्टिकोन ठेवून स्वतः उभे केले कोरोना सेंटर; दीनदलित दुर्बल घटकातील रुग्णांची करतोय 24 तास सेवा
पारनेर/प्रतिनिधी :
कोरोनाची रुग्ण संख्या वाढत आहे. त्यामुळे अनेक धक्कादायक घटना समोर येत असताना आपल्या जीवाची पर्वा न करता समाजाचे आपण काहीतरी देणे लागतो ही सामाजिक भावना मनात ठेवून. पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर येथील अमोल साळवे हे 24 तास कोरोना रुग्णांची सेवा करत आहेत. अमोल साळवे यांनी स्व. आमदार वसंतराव झावरे पाटील यांच्या विचारांना आदर्श मानून टाकळी ढोकेश्वर येथे त्यांनी व त्यांचे सहकारी प्रा.सागर हांडे सर यांनी त्यांच्या मालकीची असलेली प्रियदर्शनी पब्लिक स्कूल या शाळेत 300 बेड'चे अद्यावत असे सर्व सुख सुविधा युक्त कोरोना सेंटर सुरू करण्यासाठी दिली आहे. त्याठिकाणी अमोल साळवे स्वतः आपल्या जिवाची पर्वा न करता रुग्णांची मनोभावे सेवा करत आहेत. सामाजिक कामाची पहिल्यापासूनच अमोलला आवड आहे. समाजात राहून काम करत राहणे आणि समाजाची सेवा करणे हेच आपल्या जीवनाचे सध्या आमोलने ब्रीद मानले आहे.
झावरे पाटील परिवारावर असलेल्या प्रेमामुळे टाकळी ढोकेश्वर येथील प्रियदर्शनी पब्लिक स्कूल येथे आपल्या स्वतःच्या शाळेमध्ये स्व. आमदार वसंतराव झावरे पाटील यांच्या नावाने कोरोना सेंटर सुरू करून आपल्या टाकळीढोकेश्वर ढवळपुरी परिसरातील आदिवासी पट्ट्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांना तसेच समाजातील दुर्बल घटकांना त्या त्याठिकाणी कोरोना या आजारावर उपचार उपलब्ध करून दिले आहेत. या रुग्णांची अमोल साळवे हा युवक 24 तास सेवा करत आहे. रुग्णांची अगदी घरच्या सारखी काळजी घेत आहे. कोरोना रुग्णांच्या करमणुकीसाठी आणि रुग्णांचे मानसिक संतुलन चांगले राहण्यासाठी कोरोना सेंटरमध्ये विविध उपक्रम राबवले जात आहेत. स्वर्गीय आमदार वसंतराव झावरे पाटील यांच्या विचारांचा वारसा असलेले व सामाजिक भान असलेले जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुजीतराव झावरे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेले रुग्णसेवेचे हे काम कोरोनाचे वाढते संकट ओळखून समाजहितासाठी सुरू आहे. अमोल साळवे हा कोणत्याही प्रकारे प्रसिद्धीसाठी काम करत नसून समाजामध्ये राहून समाजाचे आपण काहीतरी देणे लागतो हीच सामाजिक भावना मनात ठेवून अमोलने या रुग्ण सेवेमध्ये वाहून घेतले आहे.
मध्यमवर्गीय कुटुंबातील अमोल प्राथमिक शिक्षक असून अमोल'ची पत्नी सुप्रिया अमोल साळवे या टाकळीढोकेश्वर पंचायत समिती गणातून पंचायत समिती सदस्य आहेत. अमोलने पंचायत समितीच्या माध्यमातून टाकळी ढोकेश्वर जिल्हा परिषद गट व गण यामध्ये अनेक विकासात्मक कामे मार्गी लावले आहेत आता कोरोनाच्या संकटातही अमोल एक पाऊल पुढे राहून समाज सेवेचे हे व्रत हाती घेऊन कोरोनाग्रस्तांची रुग्णसेवा करत आहे. अमोल साळवे हे स्वतःचा जीव धोक्यात घालून करत असलेली ही रुग्णसेवा पाहून अमोलचे मित्र, नातेवाईक, हितचिंतक कार्यकर्ते, अमोलच्या या कामाचे कौतुक करत आहेत. आपल्या भागात राहणाऱ्या आदिवासी समाजासाठी काम करत असताना अमोलने आत्तापर्यंत विविध शासकीय योजना या समाजासाठी राबविल्या आहेत आदिवासींसाठी अमोल हा खऱ्या अर्थाने एक देवदूतच आहे. आपली आदिवासी जनता कि आता कोरोनाच्या संकटात सापडली आहे हे पाहून अमोल ने पारनेर तालुक्याचे खऱ्या अर्थाने विकास पुरुष असलेले स्व. आमदार वसंतराव झावरे पाटील यांच्या विचारांना आदर्श मानून त्यांच्या नावानेच कोरोना सेंटर सुरू करून आदिवासी समाजातील कोरोना पॉझिटिव रुग्णांची सेवा करत आहे. समाजामध्ये राहुन निस्वार्थ व प्रामाणिक सेवा करत असलेल्या अमोल साळवे या युवकास माझाकडून खूप साऱ्या शुभेच्छा.
कोरोनात आरोग्यसेवेच्या माध्यमातून समाजासाठी घेतले वाहून
कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे रुग्ण संख्येत मोठी वाढ झाली आहे हे ओळखून अमोल साळवे या टाकळी ढोकेश्वर येथील युवकाने आपली स्वतःच्या मालकीच्या शाळेतच कोव्हिड सेंटर सुरू करून तो स्वतःही आता आपले घरदार विसरून कोरोना रुग्णांची 24 तास सेवा करत आहे. कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचे मानसिक संतुलन चांगले राहण्यासाठी त्यांच्यासाठी विविध उपक्रम घेत आहे. अशाप्रकारे अमोल साळवे हा रुग्णांची मनोभावे सेवा करत आहे आणि कोरोनाच्या संकटात आरोग्य सेवेच्या माध्यमातून तो समाजातील गरीब व दुर्बल दिन दलित आदिवासी घटकांसाठी देवदूतच बनला आहे.
स्वतःच्या जीवाची व घरची पर्वा'न करता समाजसेवा
अमोल साळवे हा प्राथमिक शिक्षक असून मध्यमवर्गीय कुटुंबातील असलेल्या अमोल चे वडील सुखदेव व आई शोभा वृद्ध आहेत तर घरी पत्नी सुप्रिया व दोन लहान मुले आहेत अमोल ची मुलगी केवळ नऊ महिन्याचीच आहे तरीही या कोरोनाच्या महाभयंकर संकटात जीवाची कोणत्याही प्रकारे पर्वा न करता समाजसेवेचे वेड लागलेला अमोल कोरोनाग्रस्तांसाठी दिवस-रात्र एक करत आहे. या सर्व आरोग्यसेवेमध्ये कुटुंबाचा अमोलला मोलाचा आधार असून पाठिंबा आहे. अमोलने स्वतःला वाहून घेतलेल्या या समाजसेवेच्या कामाचे समाजातून मोठ्या प्रमाणात कौतुक होत आहे.


0 Comments