ग्रामसमृद्धी फाऊंडेशन वडनेर बु।। ची पारनेर कोव्हीड केअर सेंटरला खाटांची मदत

पारनेर प्रतिनिधी

कोरोनाच्या वाढत्या प्रभावामुळे उपलब्ध सोयीसुविधा कमी पडत असताना ग्रामसमृद्धी फाऊंडेशनने कमी वेळेत खाटांची उपलब्धता करून दिल्याने रुग्णांची गैरसोय कमी होईल, तसेच फाऊंडेशनचे अनुकरण करून इतरही लोक मदतीसाठी पुढे येतील असे मत तहसीलदार सौ. ज्योती देवरे यांनी व्यक्त केले.

पारनेर ग्रामीण रुग्णालय विस्तारित पूर्णवाद भवन कोव्हीड सेंटरला ग्रामसमृद्धी फाऊंडेशनच्या वतीने खाटा सुपूर्द केल्या त्यावेळी त्या बोलत होत्या. 

कोरोना रुग्णांची संख्या वाढल्याने कोव्हीड केअर सेंटरमध्ये खाटांची संख्या कमी पडत होती. पर्यायाने रुग्णांची गैरसोय होत होती. त्या अनुषंगाने तहसीलदारांनी मदतीचे आवाहन केले होते. या आवाहनाला प्रतिसाद देत ग्रामसमृद्धी फाऊंडेशन वडनेर बु. या सामाजिक संस्थेने नवीन खाटांची खरेदी करून कोव्हीड केअर सेंटरला सुपूर्द केल्या आणि या समस्येवर तोडगा काढला. यावेळी ग्रामसमृद्धी फाऊंडेशनचे अध्यक्ष विकास वाजे, खजिनदार सोपान येवले, डॉक्टर श्रीकांत पठारे, तालुका पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष संजय वाघमारे, मनसे शहरप्रमुख वसीम राजे, कुशाभाऊ बाबर उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments