कुरुंद येथील 45 वर्षा वरील नागरिकांना लसीकरण; नागरिकांतून समाधान व्यक्त


पारनेर प्रतिनिधी

 कुरुंद ता-पारनेर येथे आज सोमवार २६ एप्रिल रोजी ४५ वर्षावरील व्यक्तींना कोरोना प्रतिबंध लसीकरण करण्यात आले. पंचायत समितीचे माजी सभापती सुदाम पवार,नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्य कैलास कोठावळे व  निलेश शेंडगे यांच्या विशेष प्रयत्नातुन  कुरुंद येथे लसीकरनाचा फायदा हा सर्वसामान्य जनतेला झाल्यामुळे परिसरातील जनतेने समाधान व्यक्त केले आहे.

 कुरुंद, कोहकडी, म्हसे या गावातील नागरिकासाठी आयोजित करण्यात आलेल्या या लसीकरण कार्यक्रमाचे उद्घाटन मा.सभापती सुदाम पवार,कोहकडीचे सरपंच डॉ साहेबराव पाणगे ,कुरुंद चे सरपंच मधे, भाऊ पाटील मदगे यांच्या हस्ते झाले.वाडेगव्हान मंडल अधिकारी कोळी  यांच्या मार्गदर्शनाखाली व  सी.एच.ओ प्रिया देशमुख  यांच्या नेतृत्वाखाली मोरे मॅडम,चौधरी साहेब, अंगणवाडी सेविका,शिक्षक वर्ग,उपसरपंच कारखिले,दशरथ कुलाळ, शिवाजी चौधरी, सदस्य चेतन उबाळे, बाप्पू खेमनर,बाबू भोसले,लिपिक अजित यादव यांनी प्रयत्न केले. नागरिकांना निघोज ला जाऊन लस  घेणे शक्य होत नाही त्यामुळे गावातच लस मिळाल्याने कुरुंद मधील नागरिक समाधानी आहे.

Post a Comment

0 Comments