घरात बसणार्यांनी अर्थव्यवस्थेचा कणा संभाळणार्या कामगारांचा जयजयकार करावा - शरद पवळे
पारनेर प्रतिनिधी
आज देशभरात कोरोणाच्या दुसर्या लाटेने महाभयंकर थैमान घातले असुन काही राज्यांमध्ये लाॅकडाउन सुरु झाले आहे. कोरोना नियंत्रणात आणणे शासणाला मोठ्या कसरतीचे बनले असुन दुसर्या बाजुला शासणाच्या तिजोरीवर निर्माण झालेला मोठा अतिरीक्त भार संभाळण्यासाठी सरकारकडुन उद्योगदंधे चालु ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. उद्योगधंदे सुरू असल्याने शासनाला मोठा आर्थिक हातभार लागत असून कोरोनाच्या भीषण परिस्थिती आपली आव आपल्या कुटुंबाची जबाबदारी असताना कंपनी मध्ये काम करणारे कामगारच खऱ्या अर्थाने अर्थव्यवस्थेला बळकट करणारे कोरोना योद्धा आहे असे मत सामाजिक कार्यकर्ते शरद पवळे यांनी व्यक्त केले आहे.
दिवसेंदिवस कोरोनाच्या भिषण परिस्थितीमध्ये कंपनीत काम करणार्या अनेक कामगारांना कोरोनाची लक्षणे आढळून येत आहेत. कामगारासोबत कामगाराचा परिवार अत्यंत बिकट परिस्थितीमध्ये हा जीवघेणा संघर्ष करत आहे. त्यामुळे अर्थव्यवस्थेचा शिलेदार ठरणार्या कामगाराबरोबर कामगाराच्या परिवाराच्या कोरोना उपचाराची जबाबदारी कंपणीबरोबर सरकारने स्वीकारावी. आज अर्थव्यवस्थेला बळकट करणारा देवदुत जीव धोक्यात घालुन काम करत आहे. त्यांच्याकडे जाणीपुर्वक दुर्लक्ष होताना निदर्शनास येत असुन कामगार स्वखर्चाने उपचार घेतना हतबल होताना दिसत आहे. याला कोणीही गांभिर्याने घेत नाही, तरी कामगारांनी सुरक्षिततेचे सर्व नियम पाळुन आपल्याबरोबर आपल्या परिवाराची काळजी घ्यावी. त्याचबरोबर सरकारवर अवलंबु न राहता अर्थव्यवस्थेचा कणा ठरणार्या कामगारांनी स्वसन्मानासाठी "जय कामगारचा नारा चालु करावा" असे मत कामगार दिनाचे औचित्य साधत सामाजिक कार्यकर्ते शरद पवळे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना व्यक्त केले.

0 Comments