कोव्हीड सेंटरमधील रुग्ण आपल्याच परिवारातील समजून त्यांना मदत करण्याचे आवाहन
पारनेर
सध्या कोरोनाचा हाहाकार माजला असून कित्येक जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. सध्या माणसाने पैसा कमविण्यापेक्षा माणुसकी जपणे महत्वाचे असल्याचे जिवंत उदाहरण गांजिभोयरे येथील नागरिकांनी दाखवून दिले. डॉ श्रीकांत पठारे संचलित कोव्हीड सेंटरला राहुल तामखडे व डी के पांढरे पाटील मित्र परिवारातर्फे १ हजार अंडे रुग्णांना भेट देण्यात आले.
सध्या कोरोनापासून वाचण्यासाठी घरात राहून आपल्या व आपल्या परिवाराची काळजी घेण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे. कोव्हीड सेंटरमध्ये असणारे सर्वच रुग्ण परिवारातील व्यक्ती असून त्यांच्या देखील आरोग्याची काळजी तितकीच महत्वाची आहे. त्यांना सकस आहार व प्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी तामखडे व पांढरे परिवरकडून समाजीम बांधिलकी जपत पारनेर येथील पूर्णवाद भवन येथे डॉ श्रीकांत पठारे संचलित कोव्हीड सेंटरमधील रुग्णांना एक हजार अंडी भेट देण्यात आली. समाजातील सर्वांनीच आपल्या परीने कोव्हीड सेंटर मधील रुग्णांना मदत देण्याचे आवाहन देखील यावेळी करण्यात आले. डॉ श्रीकांत पठारे यांच्याकडे हे अंडे भेट देण्यात आले यावेळी डॉ श्रीकांत पठारे, सामाजिक कार्यकर्ते राहुल तामखडे, डी के पांढरे पाटील, प्रमोद पठारे,दत्तराजे निंबाळकर आदी उपस्थित होते.
कोव्हीड सेन्टर सुरू केल्यापासून अनेक रुग्णांना उपचार करून त्यांना बरे केले आहे.समाजात सामाजिक काम करत असताना दानशूरांची कमी नाही. आपण समाजसेवा एका हाताने केल्यावर समाजातील हजारो हात समाजसेवेसाठी समोर येत असल्याचा प्रत्यय कोव्हीड सेंटरच्या माध्यमातून मला आला आहे. अनेक दानशूर सर्वोत्तपरी मदत करत आहे. यातूनच सामाजिक कामाची ऊर्जा मिळत असल्याची प्रतिक्रिया डॉ श्रीकांत पठारे यांनी दिली.


0 Comments