पारनेरमध्ये लोकसहभागातून चॅरिटेबल हॉस्पिटल सुरू करण्याचा डॉ श्रीकांत पठारे यांचा निर्धार


नागरिकांना मिळणार मोफत वैद्यकीय सुविधा ; लोकवर्गणीतून तयार करणार अद्ययावत मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल



पारनेर चंद्रकांत कदम


सध्या कोरोना रुग्णाने देशभर थैमान घातले असून अनेक नागरिकांना जीव गमवावा लागला आहे. कोरोनाबाधीत रुग्णांना बेड भेटत नाहीत, काहींना ऑक्सिजन भेटत नाही तर काहींना व्हेंटिलेटर, यामुळे रुग्णांचा जीव गमवावा लागत आहे. सध्या पारनेर तालुक्यातील रुग्णांची संख्या गंभीर असून रुग्णांच्या मानाने त्यांना उपचारासाठी दवाखाने भेटत नाही. त्यामुळे रुग्णांना इतरत्र उपचार घ्यावा लागत असून उपचाराचे  बिल भरणे नागरिकांच्या खिशाला परवडणारे नाही. त्यामुळे पारनेर तालुक्यात लोकसहभागातून एक मोठे चॅरिटेबल ट्रस्ट अंतर्गत अद्ययावत हॉस्पिटल उभारून नागरिकांना मोफत उपचार करता येईल. म्हणून एक मोठे चॅरिटेबल हॉस्पिटल उभारण्याचा  निर्धार पारनेर पंचायत समिती सदस्य डॉ.श्रीकांत पठारे यांनी केला आहे. लोकसहभागातून हे हॉस्पिटल तयार करायचे असल्याने यासाठी समाजातील दानशूरांनी समोर यऊन लोकवर्गणीतून हे हॉस्पिटल तयार करण्यासाठी मदत करण्याचे आवाहन डॉ पठारे यांनी केले आहे.


         सध्या पारनेर तालुक्यामध्ये एकही मोठे अद्ययावत हॉस्पिटल नसल्याने नागरिकांना दुर्धर आजाराचे निदान करण्यासाठी जिल्ह्याच्या ठिकाणी अथवा पुणे, मुंबई वेळप्रसंगी परराज्यात देखील जावे लागते. आर्थिक परिस्थितीने मजबूत असणारे बाहेर जाऊन महागडे उपचार घेऊ शकतात. पारनेर तालुका हा दुष्काळी तालुका म्हणून ओळखला जातो. त्यामुळे दुष्काळी भागातील सर्वसामान्य जनता व शेतकरी वर्गाला बाहेरील महागडे उपचार करणे शक्य नाही त्यामुळे त्यांना अंगावर दुखणे काढावे लागत असून परिणामी गंभीर समस्यांना सामोरे जावे लागत आहे. वेळप्रसंगी यामध्ये रुग्ण उपचाराभवी जीव गमावत आहे. त्यामुळे आपल्या तालुक्यातील नागरिकांची आर्थिक स्थिती पाहता आपल्या तालुक्यात एक मोठे अद्ययावत सार्वसोयीनयुक्त हॉस्पिटल असणे गरजेचे आहे. सध्या पारनेर येथील पूर्णवाद भवन येथे डॉ श्रीकांत पठारे संचलित कोव्हीड सेंटर सुरू असून त्यामध्ये उपचार घेण्यासाठी रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असून बेडअभावी रुग्णांना उपचार करता येत नाहीत. त्यामुळे अपल्या तालुक्यात किमान २०० बेड, व माणसाच्या शरीरातील सर्व घटकांची तपासणी करण्यासाठी लागणाऱ्या सर्व सोयी असणाऱ्या मशिनरी, अद्ययावत लबोरोटरी, मेडिकल सुविधा असणारे चॅरिटेबल ट्रस्ट हॉस्पिटल लोकसहभागातून सुरू करण्याचा मानस डॉ श्रीकांत पठारे यांनी बोलून दाखवला आहे. या हॉस्पिटलच्या माध्यमातून तालुक्यातील सर्व रुग्णांना एकाच छताखाली सर्व आजारांचे, निदान, उपचार, शस्त्रक्रिया पूर्णतः मोफत करावयाचे आहे. त्यामुळे तालुक्यातील सर्व तळागाळातील जनतेला आपल्या आरोग्याची काळजी घेता येईल व उपचारासाठी लागणार भरमसाठ पैसा देखील वाचणार आहे. असे मत डॉ श्रीकांत पठारे यांनी व्यक्त केले आहे. 


स्वतःचा खासगी दवाखाना असताना देखील पारनेर तालुक्यात स्वतःच्या दवाखान्याच्या समोर कोव्हीड सेंटर उभारून  रुग्णांना मोफत उपचार देऊन वेळप्रसंगी आपल्या खासगी दवाखान्यातील सर्व सुविधा कोव्हीड सेंटर मध्ये रुग्णांना मोफत डॉ श्रीकांत पठारे देत आहेत. त्यांच्या या कामाची दखल घेऊन महसूलमंत्री ना.बाळासाहेब थोरात, खा. सुजय विखे पाटील, आमदार निलेश लंके, तहसीलदार ज्योती देवरे यांच्यासह जिल्हातील व महाराष्ट्रातील नेतेमंडळींनी  डॉ पठारे व त्यांच्या पत्नीचे कौतुक केले आहे. तसेच तालुक्यातील जनतेसाठी येत्या काही काळात लोकसहभागातून मोठे चॅरिटेबल हॉस्पिटल उभारून नागरिकांना मोफत उपचार देण्याचा निर्धार करणारे पारनेर पंचायत समिती सदस्य डॉ. श्रीकांत पठारे हे संबंध राज्यातीलच नव्हे तर देशातील पहिले व एकमेव "डॉ . श्रीकांत पठारे" हेअसणार आहेत.


पारनेर तालुक्यातील गोरगरीब रुग्णांना आपल्या आरोग्याची काळजी घेऊन कोरोना महामारी सारख्या रोगराईच्या काळात मोफत उपचार भेटण्यासाठी लोकसहभागातून आपण एक मोठे अद्ययावत किमान २०० बेडचे चॅरिटेबल ट्रस्ट उभारणार असून त्यामध्ये सर्व रुग्णांना मोफत उपचार केले जातील. या हॉस्पिटलच्या उभारणीसाठी तालुक्यातील व जिल्ह्यातील  दानशूरांनी समोर येऊन मदत करावी. सध्याच्या महामारीच्या काळात दवाखानेच मनुष्याच्या जीवनातील अविभाज्य घटक बनला असून या हॉस्पिटलच्या उभारणीसाठी दान देणाऱ्या दानशूरांनी माझ्याशी संपर्क साधावा असे आवाहन पारनेर पंचायत समिती सदस्य व ओंकार मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचे संचालक डॉ श्रीकांत पठारे यांनी केले आहे.

Post a Comment

0 Comments