लोककनियुक्त सरपंच पंकजदादा कारखिले यांची यशस्वी संकल्पना
पारनेर प्रतिनिधी
कोरोनाच्या संकट काळात प्रत्येक पदाधिकारी समाजातील प्रत्येक घटकांसाठी वेगळ्या प्रकारे धावून येत आहे. अशाच आपल्या मायभुमीतील जनतेसाठी राळेगण थेरपाळचे कृतीशील लोकनियुक्त सरपंच पंकजदादा कारखिले यांनी वेगळाच प्रयोग राबविला आहे. लस घेण्यासाठी राळेगणकरांना १२ किमी लांब निघोज येथे जावे लागत होते. त्यांनी विशेष प्रयत्न करून ती लस गावातच राळेगण थेरपाळ येथील आरोग्य केंद्रात उपलब्ध करून दिली. आज तेथील ग्रामस्थांना गावातच लस मिळाल्याने त्यांची फरफट थांबणार आहे.
तालुक्यातील राळेगण थेरपाळ हे निघोज प्राथमिक आरोग्य केंद्रा अंतर्गत येते. येथील ग्रामस्थांना लसीकरणासाठी निघोजला १२ किमी जावे लागत होते. यामध्ये वयोवृद्ध, महिला यांची मोठ्या प्रमाणात हाल व्हायचे. लोकनियुक्त सरपंच पंकजदादा कारखिले यांनी खा. डॉ. सुजयदादा विखे पाटील यांना मागणी केली होती. लसीकरण प्रत्येक गावागावात करण्यात यावे जेणेकरून नागरिकांचे जाण्यायेण्याचे हाल होणार नाहीत व गर्दी कमी होऊन संक्रमण होणार नाही अशी संकल्पना सरपंच पंकजदादा कारखीले यांनी खा. विखे यांच्यासमोर मांडली होती. त्यानुसार आज जिल्हा परिषद आरोग्य अधिकारी डॉ सांगळे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ लाळगे व आरोग्य केंद्र अधिकारी डॉ प्रशांत चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली राळेगण थेरपाळ येथे लसीकरण उपलब्ध झाले आहे.


0 Comments