तालुक्यातील डॉक्टर सहकाऱ्यांकडून डॉ पठारे संचलित कोव्हीड सेंटर ला वैद्यकीय मदत भेट

नागरिकांकडून कोव्हीड सेंटरला वैद्यकीय मदतीचा ओघ सुरूच.


पारनेर प्रतिनिधी


डॉ श्रीकांत पठारे संचलित पूर्णवाद भवन येथे सुरू असलेल्या कोव्हीड सेंटरला पारनेर तालुक्यातील डॉक्टर व पशुवैद्यकीय डॉक्टर यांनी वैद्यकीय मदत देत सामाजिक बांधिलकी जपली आहे.


पिंपळनेर येथील डॉ. अनिल रासकर, डॉ. सुनील रासकर , राळेगण थेरपाळ येथील पशुवैद्यकीय डॉ. नितीन कारखीले यांनी आज पारनेर येथील पूर्णवाद भवन येथील डॉ. श्रीकांत पठारे संचलित कोविड सेंटर ला सलाईन तसेच आय व्ही सेट मदत स्वरूपात दिले. यावेळी डॉ श्रीकांत पठारे, प्रमोद पठारे,जगदीश सोनवणे, चंद्रकांत कदम, अमोल गजरे, अमोल ठुबे आदी उपस्थित होते.

समाजातील अश्या दानशूर व्यक्तींच्या सहकार्याने आजही आपण कोरोना आजाराशी लढा देत आहोत, आपले सर्वांचे असेच योगदान मिळावे अशी अपेक्षा डॉ श्रीकांत पठारे यांनी व्यक्त केली.

Post a Comment

0 Comments